चाकूर गोठा आग

गोठ्याला आग लागून ७ जनावरे खाक!

Chachur Gotha fire: चाकूरमध्ये गोठ्याला आग लागून सात जनावरे खाक; सोयाबीन व शेतीची उपयोगी साहित्य जळाले. शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान.

गोठ्याला आग लागून ७ जनावरे खाक!

Chachur Gotha fire

जानवळ शिवारातील दुर्घटना: सोयाबीनसह शेती उपयोगी साहित्य जळाले

चाकूर (Chachur Gotha fire) : तापमानाचा पारा 41 अंशावर असतानाच तळपत्या उन्हात गोठ्याला आग लागून सात जनावरे मृत्युमुखी पडली. चाकूर तालुक्यातील जानवळे शिवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या आगीत 21 कट्टे सोयाबीन सह, गुरांसाठी ठेवलेली वैरण तसेच शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली. चाकूर तालुक्यातील जानवळ येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने तळपत्या उन्हामध्ये ही आग लागली. जिवंत जनावरे धडधड जळत असताना जनावरांचा आरडाओरडा शेतकऱ्यांने हंबरडा फोडला. ज्या जनावरांना जीवाचं रान करून सांभाळले तेच डोळ्यादेखत जळून खाक झाले, हे पाहून अक्षरशः अनेकांचे मन हेलावून गेले.

 जानवळ शिवारात तळपत्या उन्हात जनावरांच्या गोठ्याला आग लागून सात जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तसेच सोयाबीन, विद्युत वायराचे बंडल व शेतीची औजारे जळून खाक झाल्याची घटना जानवळ गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गट नंबर ३५९ मध्ये ज्ञानोबा नारायण भोजने (वय ४५ वर्षे) यांची अडीच एकर जमीन आहे. यामध्ये त्यांनी जनावरे बांधण्यासाठी व शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी गोठा बांधला होता. (Chachur Gotha fire) गुरुवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटाला तळपत्या उन्हात गोट्याला आग लागून ०३ जर्सी गायी, २ वासरे व २ गोरे तसेच २१ कट्टे सोयाबीन, विद्युत वायराचे बंडल, जनावरांचा कडबा व शेतीचे औजारे जळून खाक झाले असून यामध्ये एक गोरे ७० ते ८० टक्के भाजले असल्याची माहिती ज्ञानोबा भोजने यांचा मुलगा शिवशंकर भोजने यांनी दिली. यामध्ये या शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी जमली. तर ही (Chachur Gotha fire) घटना माहीत होताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्याची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत एक लाख रुपये मदत या शेतकऱ्याला दिली.  पण या शेतकऱ्याचे झाले नुकसान पाहता अक्षरशः मौल्यवान पशुधन त्यांनी जीवा जतन सांभाळ केला होता व यावरच त्यांची उपजीविका होती, पण अचानक दुपारी एक वाजता लागलेल्याआगिने रुद्र रूप धारण केल्याने आग विजवणे मुश्किलीचे झाले या आगीमध्ये अक्षरशा गोठ्यात सावलीला बांधलेले जनावरे होती हे जनावरे आग लागल्याने अक्षरशः आरडा ओरड करत होते. पण आग एवढी मोठी होती की, विझविणे शक्य नव्हते. यामध्ये अक्षरशः जनावरे जळून तडफडत मरण पावली. या घटनेमुळे या शेतकऱ्याला आता मदतीची मोठी गरज आहे. शासनाने त्वरित या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026