पाणीपुरवठा विभाग

पाणीपुरवठा कामात निष्काळजी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

Water Supply Department: कळमनुरी नगर परिषदेने पाणीपुरवठा विभागातील निष्काळजी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली.

पाणीपुरवठा कामात निष्काळजी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

Water Supply Department

नगराध्यक्ष व नगरसेवक बैठकीनंतर ही कारवाई

कळमनुरी (Water Supply Department) : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याचे दिसून आल्याने अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अनियमितता, दैनंदिन कामकाजातील दिरंगाई, टाळाटाळ आणि निष्काळजीपणामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ठरलेल्या दिवशी पाणी न सोडणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, मोबाईल बंद ठेवणे तसेच गैरजबाबदार वर्तन यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.

या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी रविराज दरक यांनी २४ एप्रिल रोजी लिपिक एस. टी काळे, शिपाई निळकंठ मस्के तसेच वालमेन बाळू खंदारे, जब्बार शेख या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) अधिनियम १९८१ नुसार ही कारवाई करण्यात आली असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय नगरपरिषद कळमनुरी येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या काळात संबंधित कर्मचाऱ्यांना कोणताही खाजगी किंवा इतर व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, २४ एप्रिल रोजी नगराध्यक्ष व नगरसेवकांची पाणीपुरवठ्या बाबत बैठकही पार पडली या बैठकीत नगराध्यक्षा आश्लेषा वैभव चौधरी,राष्ट्रवादी गट नेता तथा नगर सेवक अय्युब पठान,नगर सेवक खाजा बागबान,बबलु पत्की,शिव सेना गट नेता तथा नगर सेवक रवी शिंदे,नगर सेविका  अर्चना खर्जुले,नगर सेविका फहीमुन्निसा बेगम अब्दुल्ला पठान,नगर सेवक जि. एस बेले,नगर सेवक प्रकाश घुसे,कैलास पारवे, शैलेश उबाळे तसेच या बैठीकित मुख्य अधिकारी रवि राज दरक,नगर अभियंता निकेत यरमाळ, अमोल मोरे,मनोज नखवाल सहीत ईतर नगर सेवक उपस्थित होते सद्या कळमनुरी शहराला इसापुर धरणातून पाणीपुरवठा होत असून सध्या धरणात सुमारे ६२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यासाठी पुरेसा साठा आरक्षित असतानाही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहराला अनियमित (Water Supply Department) पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता.

कारवाईनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार का?

नगरपालिका मुख्याधिकारी पाणीपुरवठा (Water Supply Department) वर सक्त कारवाई करून चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हे कारवाई नंतर शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का असा प्रश्न नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026
पुण्यातील द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव; अन्न परवाना तात्काळ निलंबित

पुण्यातील द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव; अन्न परवाना तात्काळ निलंबित

पुण्यातील द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये झुरळे, कीटक, उंदराची विष्ठा आणि अस्वच्छता आढळल्याने FDAने अन्न परवाना निलंबित केला. मोहिमेत 14 आस्थापनांवर कारवाई झाली.

Sep 18, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026