चिखली जालना रोडवर बुलेटचा अपघात एक ठार दोन जखमी

चिखली येथून लग्न समारंभासाठी जात असताना बुलेट स्वराचा अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यान वळणावर भीषण अपघात झाला.

चिखली जालना रोडवर बुलेटचा अपघात एक ठार दोन जखमी

Chikhli Accident

चिखली (Chikhli Accident) : चिखली येथून लग्न समारंभासाठी जात असताना बुलेट स्वराचा अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यान वळणावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ओम संजय जामदार यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम संजय जामदार (28), जय सुनिल जामदार (22) आणि अभिजित प्रमोद भवर (25, रा. आदर्श शाळेजवळ, चिखली) हे तिघे दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी लग्न समारंभासाठी बुलेटवर जात असताना अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यान असलेल्या वळणावर त्यांचा अपघात झाला. या अपघातात तिघेही जखमी झाले.

जखमींना तातडीने जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ओम संजय जामदार यांचा मृत्यू झाला, तर जय सुनील जामदार आणि अभिजित प्रमोद भवर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मृत ओम जामदार हे चिखली अर्बन बँकेचे अधिकारी संजय जामदार यांचे पुत्र आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ओम यांचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. परिसरात शोककळा पसरली.

या घटनेची माहिती मिळताच चिखली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक सतीश गुप्त, अध्यक्ष असंतोष गुप्त, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, नगरसेवक सुरेंद्र ठाकूर यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला. या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती.

संबंधित सामग्री

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

चिखलीतील रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या वाटचालीचा गौरव, सहकारातील विश्वास आणि ठेवीदारांच्या हितावर मान्यवरांचे भाष्य.

Sep 14, 2026
चिखलीत ८ सप्टेंबरला उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा; लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चिखलीत ८ सप्टेंबरला उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा; लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली येथे ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 05, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

खरीप हंगाम सुरू होऊन पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही बुलढाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 05, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026
शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या आणि मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

Aug 27, 2026