Child Abuse

भंडाऱ्यात चिमुरडीवर अत्याचार; सराईत आरोपीला अटक, जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा थरकाप उडवणारा गुन्हा!

भंडारा शहरातील एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अंगणवाडीच्या परिसरात झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

भंडाऱ्यात चिमुरडीवर अत्याचार; सराईत आरोपीला अटक, जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा थरकाप उडवणारा गुन्हा!

भंडारा : भंडारा शहरातील एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अंगणवाडीच्या परिसरात झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, धक्कादायक बाब म्हणजे याच आरोपीवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असून ते न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यानंतरही तो डिसेंबर महिन्यात जामिनावर बाहेर आला होता आणि आता पुन्हा त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुरडी अंगणवाडीत गेली होती. दुपारच्या सुमारास ती शौचालयासाठी गेली. मात्र, अंगणवाडीचे शौचालय रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला असल्याने याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिला गाठले. बाथरूममध्ये नेऊन आतून कडी लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या वेळी चिमुरडीचा आक्रोश तिच्या भावाच्या कानावर पडला. अंगणवाडीच्या शेजारीच घर असल्याने त्याने तातडीने आईला बोलावले. आईने घटनास्थळी धाव घेतली असता बाथरूम आतून बंद होते. दरवाजा उघडल्यानंतर चिमुरडी भयभीत अवस्थेत आढळून आली, तर आरोपी आतच होता. त्यानंतर आरोपीने स्वतःलाच दुखापत करून घेतल्याची माहिती समोर आली. पीडितेला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तात्काळ अटक; जलदगती न्यायालयात खटला चालविण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुराव्यांची काटेकोर मांडणी केली जाईल. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक वेगाने सुरू आहे. विशेष तपास पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

उपस्थित झालेले गंभीर प्रश्न

या घटनेने अनेक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत—

  • दोन गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी जामिनावर बाहेर कसा आला?
  • अशा स्वरूपाच्या आरोपींवर अधिक कठोर कायदेशीर निर्बंधांची गरज नाही का?
  • अंगणवाडीचे शौचालय मुख्य इमारतीपासून रस्ता ओलांडून का आहे? बालसुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर त्रुटी नाही का?
  • अंगणवाडी परिसरात मुलांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था होती का?
  • लहान मुलांच्या सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले होते?

भंडारा बंदचे आवाहन; शहरात कडेकोट बंदोबस्त

या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी भंडारा बंदचे आवाहन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026