अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत, याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत, याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Child Marriage

हिंगोली (Child Marriage) : येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी १०९८ या निशुल्क क्रमांकावर कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बालविवाह रोखण्याची जबाबदारी पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक यांच्यासह फेटेवाले, हॉटेल चालक, मंगल कार्यालय संचालक, बँडवाले आणि विवाह विधी करणारे भटजी यांच्यावरही असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह समजला जातो. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार वयाची पडताळणी शाळेचे अभिलेख, परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्यावरून करणे बंधनकारक आहे. वयाचा पुरावा उपलब्ध नसल्यास प्रकरण महिला व बालविकास समितीकडे पाठविणे आवश्यक आहे.

विवाह समारंभात सेवा देणाऱ्या सर्व संबंधितांनी बालविवाह होणार नाही, याची खात्री करावी. अन्यथा संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही ठिकाणी बालविवाह झाल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीस विकासकामांसाठी निधी रोखण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

शाळांमधील विद्यार्थिनी सलग १० दिवस अनुपस्थित असल्यास मुख्याध्यापकांनी त्वरित महिला व बालविकास विभागाला कळवावे. प्रत्येक विवाहाची नोंद घेणे आवश्यक असून नोंद न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. बालविवाह प्रतिबंध समितीमार्फत अचानक तपासण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टीसीवरील जन्मदिनांक व अधिकृत जन्मदाखला हाच ग्राह्य धरला जाईल. आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य राहणार नाही. धार्मिक स्थळांवरही बालविवाह होऊ नयेत, यासाठी धर्मगुरूंनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज

जिल्हा प्रशासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येत असून परिपत्रके पाठवून जनजागृती करण्यात येत आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके व इतर सार्वजनिक ठिकाणीही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

बालविवाह रोखायचायं-१०९८ वर कॉल करा

बालविवाहाची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026