मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

बालमृत्यू रोखण्याला आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य

CEO Vivek Gaikwad: हिंगोलीमध्ये आरोग्य विभागाने बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांवर भर दिला आहे, जेणेकरून प्रत्येक बालकाचा जीव वाचवता येईल.

बालमृत्यू रोखण्याला आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य

CEO Vivek Gaikwad

हिंगोली (CEO Vivek Gaikwad) : "जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचा जीव वाचविणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने आणि सूक्ष्म नियोजनाने काम करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड (CEO Vivek Gaikwad) यांनी केले. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित 'बालमृत्यू अन्वेषण'संदर्भात विशेष बैठकीत ते बोलत होते.

​सामाजिक व संस्था स्तरावरील मृत्यूंचे सखोल अन्वेषण

जिल्ह्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ८८ बालमृत्यूंपैकी, सामाजिक स्तर आणि संस्था स्तरावरील ६ बालमृत्यूंच्या प्रकरणांचे सविस्तर अन्वेषण या बैठकीत करण्यात आले. त्यापैकी सामाजिक स्तरावरील ३ विशेष प्रकरणांवर बालमृत्यू समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली. ​यावेळी विवेक गायकवाड (CEO Vivek Gaikwad) यांनी प्रत्येक प्रकरणाचा तांत्रिक आणि सामाजिक आढावा घेतला. बालक दगावण्यामागील नेमकी कारणे, उपचारांतील उणीव, किंवा कुटुंबियांना वेळेत मार्गदर्शन मिळाल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

भविष्यात असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात यावा 
​वेळेत उपचार: जोखमीच्या मातांची वेळेत ओळख पटवून त्यांना तातडीने योग्य संदर्भ सेवा देण्यात यावी.
​प्रत्येक मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून त्या-त्या भागात विशेष प्रतिबंधात्मक  उपाययोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने 'जीव वाचविण्याचे' आपले मूळ उद्दिष्ट समोर ठेवून काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. दि
दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलेजा कुप्पास्वामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, मनिषा वडकुते कार्यक्रम सहाय्यक मुनाफ शेख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका व आरोग्य सेविका उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026