लाठीचार्ज विरोधी मोर्चा

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नेरमध्ये लोकशाही बचाव मोर्चा

Anti-Lathi-Charge Protest March: दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नेर शहरात सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटना

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नेरमध्ये लोकशाही बचाव मोर्चा

Anti-Lathi-Charge Protest March

विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात दोषींवर कठोर कारवाईची मागणी

नेर (Anti-Lathi-Charge Protest March) : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नेर शहरात सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य 'लोकशाही बचाव मोर्चा' काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

मोर्चानंतर झालेल्या सभेत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा मारवाडी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी राहुल ठाकरे, बाबू पाटील जैत, एस. यू. धांदे, नितीन माकोडे, मोहन भोयर, बापूराव रंगारी, रवीपाल गंधे, गणेश आप्पा झाडे, नितेश कठाडे, रवी काळे, विनायक भोयर, अशोक फुलझेले, वैभव बगमारे, दिलीप माहुरे, जफर खान, सत्यविजय गुल्हाने, जगदीश सव्वालाखे, गोपाल चव्हाण, भाऊराव गायकवाड, अर्चना माहुरे, रत्ना मिसळे, सुनंदा भोयर, प्रियंका बिडकर, शुभम राऊत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG सिलेंडर 62.50 रुपयांनी महागला. दिल्लीतील 19 किलोचा सिलेंडर 2810 रुपयांवर पोहोचला, तर घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत.

Oct 01, 2026
दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तास वापराची मुभाही नाही. सुप्रीम कोर्टाने ठरावीक वेळेचा पर्याय सुचवत CPCB ला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली.

Sep 30, 2026