डॉ. प्रविण तोगडिया

विहिंपचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया परभणीत...!

Dr. Pravin Togadia: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांच्या परभणी दौर्‍यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.

विहिंपचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया परभणीत...!

Dr. Pravin Togadia

डि.एस. कदम यांच्या निवासस्थानी भेट देणार
पोलिस बंदोबस्त तैनात

परभणी (Dr. Pravin Togadia) : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया हे शुक्रवार, १० एप्रिल रोजी परभणी दौर्‍यावर येत असून सायंकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांचे शहरात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी तयारी सुरू असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. तोगडिया (Dr. Pravin Togadia) यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.  डॉ. तोगडिया यांचे लातूर येथून मोटारीने शुक्रवार १० एप्रिल रोजी सायंकाळी  ६.३० वाजता रवाना होणार आहे.

रात्री ९.३० वाजेदरम्यान त्यांचे परभणीत आगमन होणार असून शहरातील दत्त नगर येथे डि.एस. कदम यांच्या निवासस्थानी आगमन, भोजन व मुक्काम राहणार आहे. दुसर्‍या दिवशी शनिवार ११ एप्रिल रोजी सकाळी ९.४० वाजता दत्त नगर येथील वैजनाथ रेंगे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे. त्यानंतर डॉ. प्रविण तोगडिया (Dr. Pravin Togadia) हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे मोटारीने रवाना होणार आहेत. दौर्‍याच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026