Eye Donation

हिंगोलीत दुःखातूनही माणुसकीचा आदर्श; दंतवार कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

दंतवार कुटुंबीयांनी माणुसकीचा आदर्श जपत त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला.

हिंगोलीत दुःखातूनही माणुसकीचा आदर्श; दंतवार कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

स्व. उषादेवी दंतवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय; नेत्रदानातून दोन अंध बांधवांना मिळणार दृष्टी

हिंगोली : येथील जुने ग्रामीण पोलीस स्टेशनजवळील रहिवासी स्व. सौ. उषादेवी शंकरराव दंतवार (वय ६८ वर्षे) यांचे दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही दंतवार कुटुंबीयांनी माणुसकीचा आदर्श जपत त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला.

गॅलक्सी सेवाभावी संस्था, हिंगोली यांच्या समन्वयाने दुपारी दीड वाजता डॉ. संतोष खोकले यांनी नेत्रसंकलन केले. गॅलक्सी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झालेले हे ११६ वे नेत्रदान ठरले आहे. या कार्यासाठी राकेश चौरसिया आणि स्वप्नील डोंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

संकलित करण्यात आलेले नेत्र जालना येथील गणपती नेत्रालयात पाठविण्यात आले आहेत. या नेत्रदानामुळे दोन अंध बांधवांना दृष्टी मिळणार आहे. दुःखाच्या प्रसंगी घेतलेल्या या निर्णयातून दंतवार कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

स्व. उषादेवी दंतवार यांच्या पश्चात पती व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर आज, २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व. उषादेवी यांच्या नेत्रदानाच्या या महान निर्णयाबद्दल गॅलक्सी सेवाभावी संस्थेने दंतवार परिवाराचे आभार मानले असून स्व. उषादेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026