अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे आयोजित ‘शिवसंवाद’ कार्यक्रमादरम्यान पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.

अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

Farmer Aid

आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून मोघे कुटुंबाला दिलासा; खासदार श्रीकांत शिंदे व मंत्री प्रकाशराव आबीटकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

हिंगोली (Farmer Aid) : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाभा येथील तरुण शेतकरी मारुती नंदू मोघे (वय ३५ वर्ष) यांचे नुकतेच एका अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याने मोघे कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेत हिंगोली येथे आयोजित ‘शिवसंवाद’ कार्यक्रमादरम्यान पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.

ही मदत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबीटकर आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोघे कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.

जलाल दाभा येथील रहिवासी असलेले मारुती मोघे हे आपल्या कामानिमित्त जात असताना रस्त्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीची दखल घेत आमदार संतोष बांगर यांनी तातडीने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून आर्थिक मदतीची व्यवस्था केली.

‘शिवसंवाद’ कार्यक्रमात मदतीचे वितरण

हिंगोली शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसंवाद’ कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशराव आबीटकर तसेच शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आमदार संतोष बांगर यांनी मृत शेतकरी मारुती मोघे यांच्या कुटुंबीयांना मंचावर आमंत्रित केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश मोघे कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.

कुटुंबीयांकडून आभार

संकटाच्या काळात आमदार संतोष बांगर यांनी दाखविलेली तत्परता आणि शासन व पक्षाच्या माध्यमातून मिळालेली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मोघे कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरली आहे. ऐन अडचणीच्या काळात संपूर्ण शिवसेना पक्ष आणि आमदार संतोष बांगर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मोघे कुटुंबीयांनी तसेच जलाल दाभा ग्रामस्थांनी भावुक होत आभार व्यक्त केले.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026