Farmer Loan Waiver

जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

Farmer Loan Waiver

पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे नाव देऊन अपमान केल्याचा आ. रोहीत पवारांचा आरोप

हिंगोली (Farmer Loan Waiver) :
शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना आणूनही सामान्य गरीब शेतकऱ्याला न्याय न मिळणे हा त्या महामानवाचा अपमान असल्याची टीका त्यांनी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत केली.

हिंगोली येथे २६ जून रोजी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, २ जून रोजी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यांनी सरकारचे अभिनंदन केले होते. तसेच शेतकरी, महिला सबलीकरण आणि धार्मिक चळवळीसाठी कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना सुरू केल्याबद्दल सरकारचे आभारही मानले होते. मात्र शासन निर्णयाचा (जीआर) अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये अनेक जाचक अटी असल्याचे समोर आले. या अटींमुळे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले की, सामान्य लोकांना सरसकट न्याय मिळावा यासाठी महामानवांनी आयुष्यभर कार्य केले. त्यामुळे त्यांच्या नावाने योजना आणताना ती विनाअट सरसकट कर्जमाफीची असायला हवी होती. मात्र सरकारने आमचे ऐकले नाही. त्यामुळे १२ जुलैपासून पंढरपूरच्या पवित्र भूमीत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदायातील ९९ टक्के वारकरी हे शेतकरी असून, सध्या शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कर्जवाटपाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी हिंगोली जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले. त्यापैकी जिल्हा बँकेकडून केवळ २२० कोटी रुपये वितरित करण्यात आले, तर उर्वरित कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी दिले. शेतकरी आणि शेतमजूर अडचणीत असतील तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते आणि त्याचा परिणाम शहरी अर्थव्यवस्थेवरही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा विषय हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे आंदोलन शांततेत करण्यात येणार असून, प्रशासनाने बळाचा वापर केल्यास जेलभरो आंदोलनही करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह राज राजापूरकर, विकास लवांडे, डॉ. नरेंद्र काळे, प्रशांत बोराडे, भगवान आलेगावकर, अ‍ॅड. रवि शिंदे, बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे, मनीष आखरे, माधव कोरडे, धीरज काकडे, डॉ. संतोष बोंढारे, गजानन गव्हाणे, मुजीब पठाण, मोईन बागवान, अ‍ॅड. शेख मोसिन, डॉ. वेदांत मरळे, प्रा. गजानन थोरात, सोनू चव्हाण, दिलीप लाखोंचे, सुशील बोंढारे, अभिजीत देशमुख, रमेश जाधव, सिराज कुरेशी, आयुब पठाण, यशवंत देशमुख, व्यंकटेश जोगदंड, सुनील मस्के, उत्तम पोटे, ज्ञानेश्वर होडबे, दत्ता गिरी, प्रमोद वडकुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026