भीमराव ढोणे यांच्या थांबलेला ऑटो चा प्रवास पुन्हा सुरू होणार!

मालेवाडा-धामणगाव विद्यामंदिर येथे दोन मे रोजी लागलेल्या आगीमध्ये येथील भीमराव ढोणे यांचा ऑटो पूर्णता जळून खाक झाला होता.

भीमराव ढोणे यांच्या थांबलेला ऑटो चा प्रवास पुन्हा सुरू होणार!

Fire Victims Aid

माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची धामणगाव येथे भेट

भिवापूर (Fire Victims Aid) : मालेवाडा-धामणगाव विद्यामंदिर येथे दोन मे रोजी लागलेल्या आगीमध्ये येथील भीमराव ढोणे यांचा ऑटो पूर्णता जळून खाक झाला होता. त्यामुळे ढोणे कुटुंबाची रोजी रोटी संकटात आली होती. मात्र आता मात्र आता ढोणे कुटुंबाला ऑटो घेण्यासाठी राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे या ऑटोचा थांबलेला प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शासकीय मदतीतून घरांसाठी आणि काही सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होते. मात्र ढोणे कुटुंबाचा जीवन जगण्याचा आधार प्रवासी आटो पूर्णतः जळाल्याने ते चिंताग्रस्त होते. दरम्यान मंगळवारी 5 मे रोजी सायंकाळच्या सुमारास माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी धामणगाव येथे भेट देऊन आग पिडीत कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला काही रोख रक्कम आणि ऑटो दुचाकी व रंगारी कुटुंबियांची जळालेला कांडप मशीन याकरिता त्यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत मदत देण्याची घोषणा केली. यामुळे शासकीय मदती व्यतिरिक्त ज्यांचे रोजी रोटी चे साहित्य जळाले होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राजेंद्र मुळक यांच्या भेटीत गंगाधर रेवतकर, माजी जिल्हा परिषद शंकर डडमल, बाळू इंगोले, गंगाधर ठाकरे, गब्बर रेवतकर ,अशोक उमाक सुरेश शेंडे  नंदा नारनवरे संजय देशमुख , रवी मलवंडे बालू नागेकर सरपंच वैशाली चौधरी  नायब तहसीलदार प्रवीण राठोड, पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026