सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

आलेगाव येथे भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

Free Water Tanker

सेवा हीच आमची ओळख – “कामं बोलतंय कामं”

आलेगाव (Free Water Tanker) : आलेगाव येथे भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आलेगाव परिसरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून अनेक माय-माऊलींना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांच्या विनंतीला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपत निलेश कापकर यांच्या पुढाकारातून हा मोफत पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रात्री १२ वाजता सुद्धा पाण्याअभावी त्रस्त असलेल्या नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

“सेवा हीच आमची ओळख” आणि “कामं बोलतंय कामं” या भूमिकेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, आमचे समाधान काका गवळी हे स्वतः टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आले असताना शेत परिसरात अचानक टँकरवरून त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर व ठीक असल्याची माहिती देण्यात आली.

लोकांच्या सततच्या मागणीमुळे आज रात्रभर मोफत टँकरद्वारे पाणी वाटप सुरूच राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या वेळी नितीन ढोणे, नाजीम भाई, सखाराम लहामगे, शेपी भाई, शंकर लहामगे, सागर चांगले, केशव लहामगे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026