GST Inspector Arrest

GST नोंदणीसाठी १० हजारांची लाच; माझगावातील राज्य कर निरीक्षकाला ACB ने रंगेहात पकडले

महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे.

GST नोंदणीसाठी १० हजारांची लाच; माझगावातील राज्य कर निरीक्षकाला ACB ने रंगेहात पकडले

GST Inspector Arrest

ऑनलाइन जीएसटी नोंदणी प्रक्रियेसाठी पैशांची मागणी; तक्रारीनंतर एसीबीचा सापळा यशस्वी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

मुंबई (GST Inspector Arrest) : महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. जीएसटी नोंदणी क्रमांक मंजूर करण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (GST) विभागातील राज्य कर निरीक्षक संदीप खलाटे याला एसीबीने रंगेहात अटक केली. या घटनेमुळे जीएसटी विभागासह शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप खलाटे हे माझगाव येथील जीएसटी विभागाच्या नोडल-७ कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एका अर्जदाराने जीएसटी नोंदणी क्रमांकासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. ही प्रक्रिया पूर्ण करून जीएसटी क्रमांक जारी करण्यासाठी खलाटे यांनी संबंधित अर्जदाराकडे १०,००० रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

लाचेची मागणी मान्य नसल्याने संबंधित तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी युनिटकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने बुधवारी नियोजनपूर्वक सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खलाटे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

कारवाईनंतर एसीबीने आरोपी निरीक्षकाला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या अधिकाऱ्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांकडून लाच उकळली आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने संदीप खलाटे यांच्या निवासस्थानाची तसेच माझगाव येथील कार्यालयातील संशयास्पद कागदपत्रांची झडती सुरू केली आहे. शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने जीएसटी नोंदणी प्रक्रियेसाठी उघडपणे लाचेची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026