हर घर तिरंगा

कांद्रीत ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात; तिरंगा रॅलीने कांद्री नगरी दुमदुमली

Har Ghar Tiranga: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कांद्री नगर पंचायत हद्दीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहपपर्ण वातावरणात राबविण्यात आले.

कांद्रीत ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात; तिरंगा रॅलीने कांद्री नगरी दुमदुमली

Har Ghar Tiranga

 

'भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर तिरंगामय

कन्हान ( Har Ghar Tiranga) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कांद्री नगर पंचायत हद्दीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहपपर्ण वातावरणात राबविण्यात आले. हातात तिरंगा घेऊन काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत देशभक्तीपर घोषणांनी कांद्री नगरी दुमदुमून गेली.
               
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन खडसे यांच्या मार्गदर्शनात आयोजित अभियान भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर ग्रामीण रामटेक चे उपाध्यक्ष उमेश कुंभलकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. देशभक्तीपर गीतांच्या सुरात, ‘भारत माता की जय’च्या जय घोषात आणि हातात फडकणा ऱ्या तिरंग्यांमुळे संपुर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंग ला होता. रॅलीत भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, मंडळ महामंत्री सचिन वासनिक, उपाध्यक्ष लाखेश्वर वासाडे, कार्यालय मंत्री राजेश पोटभरे, प्रसिद्धी प्रमुख विनोद कोहळे, कांद्री शहर भाजप अध्यक्ष शिवशंकर चकोले, भारतीय जनता कामगार आघाडीचे नागपुर ग्रामीण रामटेक पदाधिकारी राहुल वंजारी यांच्यासह नितेश कांबळे, रोशन किरपान, दिनेश राऊत, शुभम यादव, आकाश कापसे, सुभाष कापसे, विक्की पारधी, विक्की आखरे आणि प्रदीप आखरे उपस्थित होते.

अभियानाच्या (Har Ghar Tiranga) माध्यमातुन नागरिकांनी आपल्या घरा वर तिरंगा अभिमानाने फडकवुन देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागा मुळे कांद्रीतील ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.

संबंधित सामग्री

कन्हान येथे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे भव्य तिरंगा रॅली

कन्हान येथे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे भव्य तिरंगा रॅली

Kanhan Tiranga Rally: भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर ग्रामीण (रामटेक जिल्हा) च्या वतीने कन्हान शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Aug 14, 2026
सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

Ghar Ghar Tiranga: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 12 ऑगस्ट रोजी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

Aug 12, 2026
'हर घर तिरंगा-२०२६’: रिसोड शहरात नगर परिषदेतर्फे बाईक रॅलीचे शानदार आयोजन

'हर घर तिरंगा-२०२६’: रिसोड शहरात नगर परिषदेतर्फे बाईक रॅलीचे शानदार आयोजन

Har Ghar Tiranga-2026: “हर घर तिरंगा – २०२६ “ मोहीमे अंतर्गत रिसोड नगर परिषद रिसोड वतीने शहरातील मुख्य भागात दिनांक १२/०८/२०२६ रोजी तिरंगा मोटारसायकल/बाईक रैलीचे आयोजन करणायत आले

Aug 12, 2026
मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

“तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

Aug 08, 2026
धाड परिसरातील यशवंत युवकांचा आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते गौरव

धाड परिसरातील यशवंत युवकांचा आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते गौरव

MLA Shweta Mahale Patil: धाड परिसरातील युवक-युवतींचा व त्यांच्या पालकांचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते सत्कार...

Jun 21, 2026