हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय

हिंगोलीत सूर्य ओकतोय आग; जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट!

Hingoli Collector Office: हिंगोलीत आठवड्याच्या पहिल्या कामकाज दिवसात (वर्किंग डे) कडक उन्हामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आले. तापमान

हिंगोलीत सूर्य ओकतोय आग; जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट!

Hingoli Collector Office

 

आठवड्याचा पहिलाच ‘वर्किंग डे' असूनही उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांची पाठ; मुख्य परिसर ओस

हिंगोली (Hingoli Collector Office) : मागील काही दिवसांपासून हिंगोली शहर आणि जिल्हाभरात तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, कडक उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी आठवड्याचा पहिलाच कामकाजाचा दिवस (वर्किंग डे) असूनही, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचा थेट परिणाम शासकीय कार्यालयांवर झाला असून, नेहमी गर्दीने गजबजणारे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पूर्णपणे शुकशुकाट दिसत होता.

दर सोमवारी विविध कामांसाठी जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मात्र, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता असह्य झाल्याने लोकांनी (Hingoli Collector Office) कार्यालयांमध्ये जाणे टाळले. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हे, तर इतर शासकीय विभागांमध्येही शुकशुकाट होता. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडत नसल्याने रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ कमालीची घटली होती.

हिंगोलीतील तापमान सातत्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी ११ ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देण्याासाठी भरपूर पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्यावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. या वाढत्या उन्हामुळे आगामी काही दिवसांत बाजारपेठांमधील दुपारच्या वेळच्या गर्दीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026