हिंगोली हेल्मेट सक्ती

जिल्ह्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती, वाहतूक नियम मोडल्यास होणार कारवाई 

Hingoli helmet compulsory: हिंगोली जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. अपघातांमध्ये वाढ झाल्याने ही नवीन उपाययोजना केली गेली आहे.

जिल्ह्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती, वाहतूक नियम मोडल्यास होणार कारवाई 

Hingoli helmet compulsory

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांचा इशारा

हिंगोली (Hingoli helmet compulsory) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आजपासून दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणार्‍यांनाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित वाहतूक जनजागृती व प्रथमोपचार माहिती कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. 

गेल्या दोन वर्षांत हिंगोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत, असे डॉ. रोहन यांनी प्रास्ताविकात सांगितले. मानवी व वित्तहानी रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार २० एप्रिल २०२६ पासून हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. चारचाकी वाहन चालकांसाठी सीट बेल्ट, दारू पिऊन वाहन न चालवणे, मोबाईलचा वापर टाळणे, ट्रिपल सीट टाळणे आदी सूचनाही देण्यात आल्या. (Hingoli helmet compulsory) अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नागरिकांनी ११२ व १०८ या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. मदत करणार्‍या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली जाईल व त्यांना कोर्टाची फेरी करावी लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. पीएम राहत योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयात जखमींवर दीड लाखांपर्यंत मोफत उपचार होतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

परिवहन विभागाने विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन न चालवण्याचे व पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने न देण्याचे आवाहन केले. वैद्यकीय पथकाने प्रथमोपचार व सीपीआरचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, संदीप मोदे, जमीर नाईक, शरद मरे, परिवहन अधिकारी चंद्रकीर्ती टिपले, विक्रांत भोईने यांच्यासह डॉक्टर पथक, ठाणेदार, पोलीस पाटील, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सपोनि शिवसांब घेवारे यांनी केले.  दरम्यान, वाहनचालकांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी व वाहन फिटनेस तपासून घ्यावा, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026