Hingoli ACB

औंढा नागनाथात कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक; फळबाग योजनेतील मस्टरच्या स्वाक्षरीसाठी मागितले होते पैसे

 शेतकऱ्याच्या फळबाग योजनेच्या कामासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.

औंढा नागनाथात कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक; फळबाग योजनेतील मस्टरच्या स्वाक्षरीसाठी मागितले होते पैसे

Hingoli ACB

हिंगोली (Hingoli ACB) : शेतकऱ्याच्या फळबाग योजनेच्या कामासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. औंढा नागनाथ तालुक्यात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी बसस्थानकासमोर ही कारवाई करण्यात आली. मोहन माने असे लाच स्वीकारताना पकडलेल्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आईच्या नावे असलेल्या शेतात कृषी विभागाच्या फळबाग योजनेअंतर्गत केळीची लागवड करण्यात आली होती. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मस्टरवर स्वाक्षरी करून कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने सहाय्यक कृषी अधिकारी मोहन माने यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, माने यांनी सुरुवातीला टाळाटाळ करत कामासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तडजोडीनंतर पाच हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने थेट हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भगवान मंडलिक तसेच गजानन पवार, शिवाजी वाघ आणि शेख अकबर यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी औंढा नागनाथ बसस्थानकासमोर सापळा रचला.

सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मोहन माने तेथे आले आणि त्यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026
हिंगोलीतील एसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नांदेडमध्ये कामगिरी; लाच घेताना दोघांना पकडले

हिंगोलीतील एसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नांदेडमध्ये कामगिरी; लाच घेताना दोघांना पकडले

Hingoli ACB Squad Action: पेट्रोल पंपासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले..

Oct 02, 2026