आमदार तान्हाजी मुटकुळे

हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तान्हाजी मुटकुळे यांची तक्षशिला बुद्ध विहाराला भेट

MLA Tanhaji Mutkule: हिंगोलीत तक्षशिला बुद्ध विहारातील बुद्ध मूर्तीची तोडफोड झाल्याचे प्रकरण समोर आले. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली.

हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तान्हाजी मुटकुळे यांची तक्षशिला बुद्ध विहाराला भेट

MLA Tanhaji Mutkule

 

मूर्ती तोडफोड प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश  

सेनगाव (MLA Tanhaji Mutkule) : सेनगाव तालुक्यातील वाढोणा फाट्यावरील तक्षशिला बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांच्या 15 फूट उंच मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करून जाळपोळ केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार श्री. तान्हाजी मुटकुळे साहेब यांनी आज, शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  

आमदार मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी विहार परिसराची बारकाईने पाहणी करत स्थानिक नागरिक, बौद्ध उपासक व पदाधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. तथागतांच्या मूर्तीची विटंबना करून जाळपोळ करण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व समाजात तेढ निर्माण करणारा असल्याचे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.  

यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आमदार मुटकुळे यांनी या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रात्रीची गस्त वाढवावी व विहार परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.  

"महामानव गौतम बुद्धांनी जगाला शांती, करुणा व समतेचा संदेश दिला. त्यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे. बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असे (MLA Tanhaji Mutkule) आमदार मुटकुळे यावेळी म्हणाले.  

या घटनेमुळे परिसरातील बौद्ध अनुयायांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कुमार मस्के यांनी दिले आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026