हिंगोली (MLA Tanhajirao Mutkule) : जिल्ह्याचा शैक्षणिक विकास वेगाने व्हावा आणि स्थानिक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मिळावे, यासाठी हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार तान्हाजीराव मुटकूळे (MLA Tanhajirao Mutkule) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता व गुणवत्ता आहे. मात्र, स्थानिक पातळीवर उच्च व तंत्रशिक्षणाच्या पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.परिणामी, येथील गरीब, शेतकरी, कष्टकरी व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि मुंबई यांसारख्या दूरच्या व मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. मोठ्या शहरांमधील महागडे शिक्षण आणि राहण्याचा मोठा खर्च सामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. आर्थिक परिस्थिती अभावी अनेक हुशार व होतकरू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
हिंगोली येथे हक्काचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यास, या भागातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल. स्थानिक पातळीवरच दर्जेदार व नामांकित तांत्रिक शिक्षण मिळाल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासाला एक नवी दिशा व गती मिळेल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आणि या मागास भागाचा सर्वांगीण विकास विचारात घेता,हिंगोली येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी द्यावी,अशी मागणी आमदार तान्हाजीराव मुटकूळे (MLA Tanhajirao Mutkule) यांनी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करा; आ. मुटकूळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
MLA Tanhajirao Mutkule: जिल्ह्याचा शैक्षणिक विकास वेगाने व्हावा आणि स्थानिक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मिळावे, यासाठी हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे,
MLA Tanhajirao Mutkule
संबंधित सामग्री
जळीत कांडावरून पुढार्यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर
Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय
Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा
Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल