हिंगोली गुटखा जप्त

हिंगोलीत स्कुटीसह 1 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एक आरोपी ताब्यात 

Hingoli Gutkha Seized: हिंगोलीतील पोलीसाने ३५,००० रुपयेंच्या प्रतिबंधित गुटखेबरोबर ७०,००० रुपयांचा वाहन खर्चाची इलेक्ट्रिक सायकल जप्त केली. एक आरोपी मोहम्मद समीर अब्दुल सत्तार याला अटक

हिंगोलीत स्कुटीसह 1 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एक आरोपी ताब्यात 

Hingoli Gutkha Seized

हिंगोली (Hingoli Gutkha Seized) : शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा वाहतुकीचा 28 जूनला पर्दाफाश केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे  व शहर पोलिस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के, अशोक धामणे, गणेश लेकुळे, मोहसीन शेख व संदीप सोनटक्के यांच्या पथकाने छापा टाकून 35 हजार 60 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 70 हजार रुपयाची इलेक्ट्रिक मोटारसायकल असा एकूण 1,05,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या (Hingoli Gutkha Seized) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आझम कॉलनी, हिंगोली येथील रहिवासी मोहम्मद समीर अब्दुल सत्तार याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026