हिंगोली नगरपालिका

हिंगोली आंबेडकर नगरातील महिला रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत धडकल्या 

Hingoli Municipality: हिंगोली शहरातील आंबेडकर नगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सोमवारी महिलांसह अनेक पुरुष रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत

हिंगोली आंबेडकर नगरातील महिला रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत धडकल्या 

Hingoli Municipality

 

पाच दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा

हिंगोली (Hingoli Municipality) : हिंगोली शहरातील आंबेडकर नगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सोमवारी महिलांसह अनेक पुरुष रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत दाखल होताच अनेकांची धांदल उडाली होती. 

हिंगोली शहरातील आंबेडकर नगर मध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे त्यातही नळाला अवघी पाच ते दहा मिनिटेच पाणी येत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी थेट रिकाम्या हंड्यासह नगरपरिषद करण्यात धाव घेतली यावेळी नगरपरिषदेला दिलेले निवेदन उपमुख्य अधिकारी साबळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता बाळू बांगर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. भर उन्हात लहान मुले आणि वृद्धांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. 

नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे कळकळीची विनंती केली आहे की, आंबेडकर नगरचा (Hingoli Municipality) पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. तसेच, येत्या पाच दिवसांत यावर ठोस उपाय न झाल्यास आंबेडकर नगर येथील नागरिक आंदोलन करतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

हे निवेदन राहुल खिल्लारे, अरविंद ढाले, अनिल टिपरे, सतिश बलखंडे, रोहन ढगे, निखिल दिपके आणि नागेश खडसे यांच्यासह सर्व आंबेडकर नगर रहिवाशांच्या वतीने देण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या या प्रश्नाकडे नगरपालिका गांभीर्याने लक्ष देते की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

टैग्स: Hingoli Municipality

संबंधित सामग्री

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक मोकाट जनावरांच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत, नागरिक हैराण

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक मोकाट जनावरांच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत, नागरिक हैराण

रविवारी (२९ जून) शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी चौकात मोकाट जनावरांनी अक्षरशः अड्डा जमवल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

Jun 30, 2026
500 KVA रोहित्रात बिघाड; हिंगोली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

500 KVA रोहित्रात बिघाड; हिंगोली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

500 KVA क्षमतेच्या रोहित्रामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला.

Jun 26, 2026