हिंगोली जिल्हा काँग्रेस

‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली..

Hingoli District Congress: हिंगोली जिल्हा काँग्रेसने संयुक्त सहभागाने 'छात्रों की गूंज' आयोजित केला. विद्यार्थ्यांनी पिक्सल, परीक्षा शुल्क व वर्षोमर्यादेच्या कारणामुळे परीक्षेआवाशी मुकाव्याची समस्या

‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली..

Hingoli District Congress

हिंगोली (Hingoli District Congress) : हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिक्षण व स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या मांडल्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटना, परीक्षा शुल्कामधील भरमसाठ वाढ, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा वेळेत होत नसल्याने वाढत्या वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच, ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटीचा धोका अधिक असल्याने एमपीएससी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या व मागण्यांना योग्य स्वरूप देऊन शासन व संबंधित यंत्रणेकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील, असे आश्वासन हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. सतीशभाऊ पाचपुते यांनी दिले.

या (Hingoli District Congress) कार्यक्रमास शेतकरी नेते रमेश शिंदे, बंटी नागरे, भास्कर पोले,जुबेर मामू, विठ्ठल जाधव, शेख सर, संजय गुहाडे, किसन जुमडे, दत्तराव जाधव, शशिकांत कांबळे, अनुप नायक, पीयूष सोनी, दिपक सोनुळे,अमन शेख, वाजिद बेग, अतुल नायक, सतिश चिभडे, वैभव इंगळे, रिया पिंपरे, प्राची नागरे, दशरथ फोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026