हिंगोली बस फेऱ्या

हिंगोली आगाराकडून उन्हाळी व लग्नसराईसाठी 24 जादा बस फेऱ्यांचे नियोजन

Hingoli Agaar Bus: हिंगोली आगाराने उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी 24 जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. विविध मार्गांवर ही सेवा उपलब्ध असेल.

हिंगोली आगाराकडून उन्हाळी व लग्नसराईसाठी 24 जादा बस फेऱ्यांचे नियोजन

Hingoli Agaar Bus

हिंगोली (Hingoli Agaar Bus) : उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगाराने विशेष नियोजन केले आहे. दिनांक 24 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत हिंगोली आगारातून विविध मार्गांवर 24 जादा बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. राप हिंगोली आगार व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रवाशांनी या जादा वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक श्रीकांत महाजन यांनी केले  आहे. उन्हाळ्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर व बीड या मार्गांवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. ती लक्षात घेऊन खालील जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत:

पुणे व छत्रपती संभाजीनगर मार्गावर हिंगोली - पुणे मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 7:00 वाजता, पुणे - हिंगोली मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 11:00 वाजता,  हिंगोली - पुणे मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 10:00 वाजता, पुणे - हिंगोली मार्गे छत्रपती संभाजीनगर मार्गावर रात्री 10:00 वाजता, हिंगोली - छत्रपती संभाजीनगर: सकाळी 6:30, दुपारी 12:30 व 2:00 वाजता,  छत्रपती संभाजीनगर - हिंगोली: सकाळी 11:30, दुपारी 12:30, सकाळी 5:30 व 6:30 वाजता आहे. नाशिक मार्गावर  हिंगोली - नाशिक मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 9:30 वाजता, नाशिक - हिंगोली मार्गे छत्रपती संभाजीनगर: रात्री 10:30 वाजता आहे.

वर्धा व अमरावती मार्गावर 

हिंगोली - वर्धा मार्गे पुसद: सकाळी 5:30 वाजता,वर्धा - हिंगोली मार्गे पुसद: सकाळी 11:30 वाजता, हिंगोली - अमरावती मार्गे वाशीम कारंजा: सकाळी 5:30 व 8:00 वाजता, अमरावती - हिंगोली मार्गे वाशीम कारंजा: सकाळी 11:30 व दुपारी 2:30 वाजता आहे.

बीड व लातूर मार्गावर

हिंगोली - बीड मार्गे पाथरी: सकाळी 5:00 व 7:00 वाजता, बीड - हिंगोली मार्गे पाथरी: सकाळी 11:30 व दुपारी 2:00 वाजता, हिंगोली - लातूर मार्गे परळी: दुपारी 1:00 वाजता, लातूर - हिंगोली मार्गे परळी: सकाळी 5:30 वाजता
आहे.

उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे एसटी बसेसला मोठी मागणी असते. (Hingoli Agaar Bus) प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हे जादा नियोजन केले आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगोली आगार व्यवस्थापक श्रीकांत महाजन यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026