हिंगोली () : शहरातील यशवंत नगर भागामध्ये अज्ञात चोरट्याने एका गायीसह दोन कारवड चोरून नेल्या. तर यामध्ये (Hingoli Cow Theft) एका गायीचा मृत्यू झाल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील यशवंत नगर भागातून गायीसह कारवड चोरून (Hingoli Cow Theft) नेल्याची घटना ९ एप्रिलला घडली. ज्यामध्ये सुनिल मदनलाल साहू यांची ६ हजार रुपयाची पांढर्या रंगाची गाय, अनिल मदनलाल साहू यांची ६ हजार ५०० रुपयाची पांढर्या रंगाची कारवड व विशाल मदनलाल यादव यांची ६ हजार ५०० रुपयाच्या दोन कारवडी अशा एकुण १९ हजाराची गाय व तीन कारवड अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच एका ६ हजार रुपयाच्या गायीला काहीतरी खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाल्याने हिंगोली शहर पोलिसात तुळजाराम साहू यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोलीत एका गायसह दोन कारवडची चोरी; एका गायीचा मृत्यू
Hingoli Cow Theft: हिंगोली शहरातील यशवंत नगरमध्ये अज्ञात चोरट्याने एका गायीसह दोन कारवड चोरून नेल्या. एका गायीला खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाला आणि पोलीस गुन्हा दाखल केला.
Hingoli Cow Theft
संबंधित सामग्री
जळीत कांडावरून पुढार्यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर
Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय
Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा
Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल