रानटी कुत्र्यांचा हल्ला

हिंगोलीत रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी हरीण ठार, पिल्लांना वाचवण्यासाठी आईचा जीवाचा त्याग

Wild Dog Attack: हिंगोलीत रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी हरीणाचा मृत्यू झाला. पिल्लांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिने आपला जीव गमावला.

हिंगोलीत रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी हरीण ठार, पिल्लांना वाचवण्यासाठी आईचा जीवाचा त्याग

Wild Dog Attack

हिंगोली (Wild Dog Attack) : टाकळगव्हाण शिवार, ता. कळमनुरी येथे आज सकाळी काळजाचा ठाव घेणारी घटना घडली. काही वेळापूर्वीच पिल्लांना जन्म दिलेल्या एका मादी काळवीट हरणावर रानटी कुत्र्यांनी हल्ला केला. गंभीर जखमी होऊनही तिने पिल्लांना वाचवले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी टाकळगव्हाण शेतशिवारात एका मादी हरणाने पिल्लांना जन्म दिला होता. प्रसूतीनंतर लगेचच रानटी कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला चढवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून मादीने पिल्लांना पळून जाण्यास मदत केली असा अंदाज आहे. या (Wild Dog Attack) हल्ल्यात हरीण जबरदस्त जखमी झाली. पोटावर व पायावर खोल जखमा झाल्याने ती निपचित पडली.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक कैलास बैले यांनी तातडीने हालचाल केली. त्यांनी वनमजूर संदीप रिठे व नागोराव रिठे यांना घटनास्थळी पाठवले. बैले यांनी स्वखर्चाने 1000 रुपये देऊन खाजगी वाहनाची व्यवस्था केली. वाहन चालक राजू सुर्वे यांच्या मदतीने जखमी हरणाला हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयात हलवण्यात आले. प्राणी मित्र रामप्रसाद जाधव व ओम जाधव यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण यादव यांना पाचारण केले. मात्र अतिरक्तस्राव, वाढले तापमान व गंभीर जखमांमुळे उपचार सुरू करण्यापूर्वीच हरणाने प्राण सोडला. स्थानिक शेतकऱ्यांनीही या बचावकार्यात सहकार्य केले.

वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था, हिंगोलीच्या म्हणण्यानुसार, मराठवाड्यात रानटी व मोकाट कुत्र्यांकडून होणारे (Wild Dog Attack) वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत. विशेषतः विणीच्या हंगामात नवजात पिल्लांसह मादी हरीण सहज शिकार बनते. वन विभागाने या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेत वनविभाग व प्राणी मित्रांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026