हिंगोली (Hingoli water shortage) : हिंगोली जिल्ह्यात सन 2025-2026 या कालावधीतील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, टंचाई परिस्थिती कुशलतापूर्वक हाताळण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात एकूण 543 उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध स्तरांवर कामे सुरू आहेत. खाजगी विहीर अधिग्रहण योजनेअंतर्गत 302 गावांमध्ये एकूण 336 विहिरी/बोअर अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या 26 गावांमध्ये 28 विहिरी/बोअर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Hingoli water shortage) 2 शासकीय टँकरच्या माध्यमातून 3 वाड्या/तांड्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच नविन विंधन विहिरी घेण्याच्या योजनेअंतर्गत 28 गावांमध्ये 36 नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित कामांची पुढील कार्यवाही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातही या (Hingoli water shortage) उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोताजवळ रिचार्ज शॉफ्ट, बंधारे आदी जलसंधारणात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई (Hingoli water shortage) मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच सन 2025 मध्ये जिल्ह्यात 142.6 टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे अतिरिक्त नाविन्यपूर्ण योजनांची आवश्यकता भासली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, आवश्यकतेनुसार टंचाई कालावधीत परिस्थितीनुरूप विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
टंचाई परिस्थिती कुशलतापूर्वक हाताळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात यश
Hingoli water shortage: हिंगोली जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना यशस्वीरीत्या राबविल्या गेल्या. पाणीपुरवठा व जलसंधारणात्मक कार्यक्रमांमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे.
Hingoli water shortage
संबंधित सामग्री
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर
Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...
चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी
Project illegal water supply: तालुक्यात पर्जन्यमान अपुरे झाल्यामुळे जलाशय, तलाव, नदी, कालवे व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग
Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.