जागतिक तंबाखूविरोधी जनजागृती

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरी मोहीम  

Global anti-tobacco awareness: हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाच्या समरूपी साठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन झाले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व वैद्यकीय अधिकारी सहभागी

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरी मोहीम  

Global anti-tobacco awareness

हिंगोली (Global anti-tobacco awareness) : जागतिक तंबाखू नकार दिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे आज तंबाखूविरोधी जनजागृतीपर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. 31 मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.  

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मोहिमेचे मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्वाक्षरी केली व तंबाखूमुक्त तसेच निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला.  

या (Global anti-tobacco awareness) प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, बाल रोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. मनीष बगडिया, डॉ. फैसल सलीम खान, डॉ. निशांत मानका, डॉ. तापडिया, डॉ. संजय देशमुख, डॉ. किरण लोंढे, डॉ. आशिष अंभोरे यांच्यासह ज्ञानेश्वर चौधरी, अजय कटारे, मोरे, कुलदीप केळकर, कुलदीप कांबळे, आनंद साळवे, नितीन पांढरे, भारतभूषण रणवीर, नागोराव वाघमारे, राम गजरे, सचिन रुपूरकर, वसिम खान पठाण, अनिकेत बांगर, मंगेश गायकवाड, अरुण वैद्य, राजेश खंदारे, वाढावे, घोंगडे, वाघोळे, भाऊसाहेब पाईकराव, भीमराव पाईकराव, अनिल टिपरे, श्रीमती गिरी, बाळु बगाटे व इतर कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.  

जागतिक तंबाखू नकार दिनाच्या (Global anti-tobacco awareness) निमित्ताने तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व त्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश होता. सहभागी झालेल्या सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी आयुष्य जगण्याची शपथ घेतली.

संबंधित सामग्री

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

Hingoli Hospital Raksha Bandhan: महिला पतंजली योग समिती व लोकसेवा मंडळ रुग्ण मित्र यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन

Aug 31, 2026
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली येथे आढावा

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली येथे आढावा

District Hivtap Office: १८ ऑगस्ट रोजी पुण्याच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण अधिकारी, डॉ. प्रणिल कांबळे यांनी हिंगोलीच्या जिल्हा हितवताप कार्यालयात भेट घेतली.

Aug 18, 2026
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; ६०० पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; ६०० पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे.

Aug 16, 2026
“भारताने अविकसित देश म्हणूनच राहावे का?” ; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

“भारताने अविकसित देश म्हणूनच राहावे का?” ; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

India Underdeveloped Country: भारतातील सर्वोच्च न्यायालयाने विकसित देशांच्या मुकाबलेने ‘फ्रंट-ऑफ-पॅकेज लेबलिंग’ (एफओपीएल) लागू करण्यासाठी केंद्रीय सरकारला निर्देश दिले.

Aug 16, 2026