Maharashtra Health Department

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; ६०० पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; ६०० पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू

२५० दंतचिकित्सकही आरोग्य सेवेत दाखल होणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत तब्बल १,४४० डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असून, आणखी ६०० डॉक्टरांच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन ‘जन आरोग्य संवाद’ साधला. या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असून, आगामी काळात आणखी चार लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

‘जन आरोग्य संवाद’दरम्यान आरोग्य समित्यांच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातात का, डॉक्टर वेळेत रुग्णालयात उपस्थित राहतात का, रुग्णांशी त्यांचा संवाद कसा असतो, तसेच रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याबाबत थेट माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्या ओळखून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना आरोग्य सेवांबाबतच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याची तयारी आहे. या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारली जाणार आहे.

रुग्णांना सकस आणि पोषक आहार मिळावा यासाठी स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून व्यवस्था उभारण्याचाही विचार आहे. या माध्यमातून रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या गुणवत्तेचा आहार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची सूचना केली. तसेच शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करण्याची शिफारस त्यांनी केली.

मुनगंटीवार यांच्या या सूचनांना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

संबंधित सामग्री

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाला.

Sep 09, 2026
कोटगुलला तालुक्याचा दर्जा द्या; ३० गावांच्या २३ मागण्यांचे निवेदन

कोटगुलला तालुक्याचा दर्जा द्या; ३० गावांच्या २३ मागण्यांचे निवेदन

Kotgula Taluka: पारंपरिक इलाखा ग्रामसभा क्षेत्र कोटगुलअंतर्गत येणाऱ्या ३० गावांच्या विविध विकासकामांसह शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभेच्या वतीने..

Aug 20, 2026
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसला मनाई!

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसला मनाई!

रात्री ९ वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट; बेड वाढविण्यासह दिव्यांगांच्या तपासणीचा घेतला आढावा

Aug 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी (दि. 18 जुलै) कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

Jul 18, 2026
आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करा: आयुक्त संजय काटकर

आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करा: आयुक्त संजय काटकर

Commissioner Sanjay Katkar: राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली

Jul 15, 2026