हैद्राबाद-जयपूर रेल्वे

हैद्राबाद - जयपूर व काचिगुडा श्री गंगानगर रेल्वे नियमित धावणार

Hyderabad-Jaipur Railway: हैद्राबाद-जयपूर आणि काचिगुडा-श्रीगंगानगर रेल्वे नियमित धावणार असून प्रवाशांसाठी वाढलेल्या प्रवास भाड्यात कपात होणार आहे.

हैद्राबाद - जयपूर व काचिगुडा श्री गंगानगर रेल्वे नियमित धावणार

Hyderabad-Jaipur Railway

वाढलेल्या प्रवास भाड्यात कपात होणार

हिंगोली (Hyderabad-Jaipur Railway) : उन्हाळी सुट्टया, धार्मिक व पर्यटन स्थळांना येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनातर्फे पुर्णा - वसमत - हिंगोली - वाशिम, अकोला मार्गावरून धावणार्‍या जयपूर व श्री गंगासागर एक्सप्रेस रेल्वेला नियमितपणे दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना विशेष रेल्वेसाठी वाढवलेल्या प्रवास भाड्यातून मुक्ती मिळून आर्थिक दिलासा मिळणार आहे. 

यापूर्वी वसमत, हिंगोली मार्गाने धावणार्‍या १७४२९/१७४३० तिरूपती - अकोला - तिरूपती रेल्वे क्रमांक १७२९५ / १७२९६ काकीनाडा - हिसार - काकीनाडा या साप्ताहीक रेल्वेला नियमित रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. याच अनुषंगाने दक्षिण मध्यरेल्वेतर्फे स्पेशल रेल्वे क्रमांक ०७०१९/०७०२० हैद्राबाद - जयपूर - हैद्राबाद नवीन नियमित रेल्वे क्रमांक १७०७९ / १७०८० व्दारे धावतील. तसेच रेल्वे क्रमांक ०७०५३/  ०७०५४ काचिगुडा - श्रीगंगा नगर - काचिगुडा व्हाया जयपूर बिकानेर साप्ताहीक (Hyderabad-Jaipur Railway) रेल्वे नवीन नियमित रेल्वे क्रमांक १७६०१/ १७६०२ व्दारे धावणार असल्याची माहिती स्टेशन मास्तर पप्पु कुमार यांनी दिली आहे. 

नागपूर - हिंगोली - कोल्हापूर व अमरावती - हिंगोली - पुणे रेल्वेला दररोज सोडून अकोला - पुर्णा मार्गाने नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणी समर स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू, प्रविण पडघन, डॉ. विजय निलावार आदींनी एका निवेदनाव्दारे केली आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची मोठी भेट; जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी चालना

वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची मोठी भेट; जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी चालना

Wardha SRPF Training Centre: राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सर्व गटांसाठी वर्धा येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Oct 01, 2026
जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

पेण स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस तीन तासांपासून थांबली आहे. इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Sep 29, 2026
नालासोपाऱ्यात धावत्या लोकलमधून पडून ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; कॅपिटल मॉलजवळ नाल्यात आढळला मृतदेह

नालासोपाऱ्यात धावत्या लोकलमधून पडून ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; कॅपिटल मॉलजवळ नाल्यात आढळला मृतदेह

नालासोपाऱ्यात कॅपिटल मॉलजवळील नाल्यात ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. लोकलमधून पडल्याचा प्राथमिक अंदाज असून ओळख अद्याप पटलेली नाही.

Sep 23, 2026