सौर प्रकल्प झाड कत्तल

सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल

Solar project tree slaughter: हिंगोलीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वन विभागाने 1200 एकर जंगलात झाडे बेकायदेशीरपणे तोडले गेले. शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आणि वन्यजीवांचा अधिवास खंडित

सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल

Solar project tree slaughter

 

प्रकल्प रद्द करण्याची विराट राष्ट्रीय लोक मंचची मागणी

हिंगोली (Solar project tree slaughter) : हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथे प्रस्तावित 200 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वन विभागाच्या 1200 एकर क्षेत्रातील 50 वर्षे जुनी हजारो झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून शेतकऱ्यांचे पारंपरिक रस्तेही बंद झाले आहेत. 

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीकडून हरित ऊर्जेच्या नावाखाली घनदाट जंगलातील वृक्षसंपदा नष्ट करण्यात आली. त्यामुळे वन्यजीवांचे अधिवास संपून प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

या कृतीमुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 48-अ, 51-अ (छ) व 21 सह वन संवर्धन कायदा 1980, भारतीय वन कायदा 1927, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, जैवविविधता कायदा 2002, वन हक्क कायदा 2006 व भूसंपादन कायदा 2013 या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टी. एन. गोदावर्मन व एम. सी. मेहता निकालानुसार वनसंरक्षण हे सर्वोच्च सार्वजनिक हित आहे.

या (Solar project tree slaughter) प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व परवानग्या सार्वजनिक कराव्यात, बेकायदेशीर वृक्षतोडीचा पंचनामा जाहीर करावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, काम तात्पुरते स्थगित करावे, नुकसानभरपाई वनीकरण करावे व शेतरस्ते त्वरित खुले करावेत, अशी मागणी शेख नईम शेख लाल संस्थापक असलेल्या संघटनेने केली आहे. 

यासंदर्भात मुख्यमंत्री, वन मंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद, जिल्हाधिकारी हिंगोली व विभागीय वनसंरक्षक हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विराट राष्ट्रीय लोक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेख लाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, जिल्हाध्यक्ष शेख बासीत महेबुब, उपाध्यक्ष रवी जैस्वाल, शहर अध्यक्ष शेख आवेज महेमुद, जिल्हा महासचिव पठाण साजीद खान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Aug 11, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीएम-किसान योजना २०३१ पर्यंत सुरू; ३.१५ लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीएम-किसान योजना २०३१ पर्यंत सुरू; ३.१५ लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पीएम-किसान (PM-Kisan) योजना २०३०-३१ पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

Aug 01, 2026
मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे नोंदविण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी

मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे नोंदविण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी

 कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले असले तरी अनेक पट्टेधारकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे अद्यापही संबंधित वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यात आलेली नाहीत.

Jul 16, 2026
मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि अभियंता योगेश आल्हाट निलंबित

मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि अभियंता योगेश आल्हाट निलंबित

मोशी येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.

Jul 15, 2026
सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.

Jun 06, 2026