Illegal Money Lending

सावकारीच्या जाचाला कंटाळून २५ कुटुंबांचे पलायन; आमदार बच्चू कडू यांची मध्यरात्री नणंद येथे भेट

निलंगा तालुक्यातील नणंद गावात बेकायदेशीर सावकारीच्या जाचाला कंटाळून तब्बल २५ कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सावकारीच्या जाचाला कंटाळून २५ कुटुंबांचे पलायन; आमदार बच्चू कडू यांची मध्यरात्री नणंद येथे भेट

Illegal Money Lending

निलंगा : निलंगा तालुक्यातील नणंद गावात बेकायदेशीर सावकारीच्या जाचाला कंटाळून तब्बल २५ कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार बच्चू भाऊ कडू यांनी गुरुवारी (दि. ३० जुलै २०२६) मध्यरात्री १२.४५ वाजता मुसळधार पावसात नणंद गावाला भेट देत पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आयोजित सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी बेकायदेशीर सावकारी आणि काही फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना कर्जाच्या नावाखाली मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असून, अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी बेकायदेशीर सावकारीचा प्रश्न सभागृहात ठामपणे उपस्थित केला होता. सावकार आणि काही फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक वसुली पद्धतीमुळे अनेक शेतकरी आणि कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता.

पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी, दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत तसेच शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांचा छळ थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नणंद येथील घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending: उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026