पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जल जीवन मिशनला घोटमध्ये ब्रेक; २२ कोटींची नळयोजना ठप्प, ७ महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जल जीवन मिशनला घोटमध्ये ब्रेक; २२ कोटींची नळयोजना ठप्प, ७ महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद

Jal Jeevan Mission

त्या 22 कोटीच्या पांढऱ्या हत्तीचे करायचे काय... ?

घोट (Jal Jeevan Mission) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या दोन महिन्यांतच बंद पडलेली ही योजना गेल्या सात महिन्यांपासून कार्यरत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून ‘हर घर जल’ हे ध्येय ठेवून जल जीवन मिशन राबविण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र घोट परिसरात ही योजना प्रत्यक्षात अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, योजनेच्या सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. योजना सुरू झाल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच पाणीपुरवठा खंडित झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

नळयोजना बंद पडल्यामुळे महिलांना व नागरिकांना दररोज दूरवरून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच गंभीर बनली असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. एवढ्या मोठ्या निधीतून उभारलेली योजना अल्पावधीतच निष्क्रिय ठरणे, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.

जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देणे, दररोज प्रति व्यक्ती किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे आणि सातत्यपूर्ण सेवा देणे हे महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र घोट परिसरात गेल्या सात महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने या सर्व निकषांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

दरम्यान, “२२ कोटींच्या या पांढऱ्या हत्तीचे आता करायचे तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नळयोजना तात्काळ सुरू करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी घोट परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026