Jaw Surgery

हिंगोली शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाच्या जबड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

हिंगोली शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

Jaw Surgery

रस्ते अपघातात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालेला जबडा शस्त्रक्रियेद्वारे योग्य स्थितीत बसवला; रुग्णाची प्रकृती स्थिर

हिंगोली : शासकीय जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाच्या जबड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

रस्ते अपघातात रुग्णाच्या जबड्याच्या हाडाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. गंभीर दुखापत झाल्याने रुग्णाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दंतरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फैसल खान (दंत रोग तज्ञ / नोडल वैद्यकीय अधिकारी) यांनी भूलतज्ज्ञ आणि परिचारिका चमूच्या सहकार्याने शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेदरम्यान फ्रॅक्चर झालेला जबडा योग्य जागी बसवण्यात आला. त्यामुळे चेहऱ्याचा आकार आणि जबड्याची कार्यक्षमता पूर्ववत करण्यात आली असून, सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी डॉ. फैसल खान तसेच त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026