महसूल पथक कारवाई

महसूल पथकाचे कळमनुरी तालुक्यात 'सर्जिकल स्ट्रॉइक

Revenue Squad Action: कळमनुरी तालुक्यातील वाळू घाटात महसूल पथकाने मोठ्या प्रमाणावर वाळू जप्त करून अवैध उत्खननावर अंकुश लावला, 11 हायवा व 4 जेसीबी सहित जप्त.

महसूल पथकाचे कळमनुरी तालुक्यात 'सर्जिकल स्ट्रॉइक

Revenue Squad Action

11 हायवा, 4 जेसीबी जप्त; साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त
सहाय्यक जिल्हा अधिकारी योगेश कुमार मीना यांच्या पथकाची धडक कार्यवाही

आखाडा बाळापूर (Revenue Squad Action) : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी (बु) शिवारातील कयाधू नदीच्या पात्रातील वाळू घाटात बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात होणारा वाळूचा उपसा थांबवून सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना व (Revenue Squad Action) महसूल पथकाने बेधडक मोठी कार्यवाही करून 11 हायवा, 4 जेसीबी पोकलेन असा सुमारे साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी उशिरापर्यंत कार्यवाही घटनास्थळी सुरु होती सदर वाहने शनिवारी पोलीस स्थानकात लावण्यात आली.

कळमनुरी तालुक्याबरोबर जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाला परंतु यापैकी अनेक घाटावर नियम निकष खुंटीला टांगून बेसुमार उपसा होतो ही वस्तुस्थिती आहे. याबाबत काही ठिकाणच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे (Revenue Squad Action) प्राप्त झालेल्या होत्या. वाळू घाटावर मजूरांच्या सहाय्याने वाळू उपसा करणे आवश्यक असताना जेसीसी मशीन, बोटीद्वारे रात्रदिवस उपसा होतो.

या तक्रारी प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्ह्याधिकारी योगेशकुमार मीना यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, आनंद काकडे, प्रेम चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम, विशाल देशमुख येलकीकर,महेश गळाकाटू, साईनाथ वानखेडे,प्रसन्न देशमुख, संतोष मुधोळ, चंद्रकांत पोटे,अशोक कुलाते महसूल पथकाने 27मार्च रोजी दुपारी उशिरा पाहणी केली तेव्हा बोटीद्वारे बिनधास्त वाळूचा उपसा होत असल्याचे  आढळून आले पथकाने तातडीने पावले उचलून 11हायवा, 4 जेसीबी, 4 बोटी  असा साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी व शनिवारी उशिरापर्यंत महसूल पथकाची कार्यवाही सुरु होती. जप्त वाहन पोलीस स्थानकात लावण्यात आली आहे.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी जाळून नष्ट..

नियम निकष खुंटीला टांगून बोटीद्वारे अवैध बेसुमार वाळू उपसा पथकाने रोखून यावेळी वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळून नष्ट करण्यात आलेल्या आहेत.तालुक्यातील विविध मंडळ अंतर्गत असे नियम निकष बाजूला करून बेसुमार वाळू उपसा, गौणखणीज उत्खनन होते महसूल विभागाने प्रथमच अशी धडक कार्यवाही केली यामुळे बेसुमार वाळू उपसा व अवैध गौणखणीज उत्खनन करणाऱ्यांची झोप उडाली आहे.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

Kalamnuri Municipal Safai Tender: शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचे सफाई टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छता कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Oct 02, 2026
कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sep 29, 2026