कळमनुरी गोवंश हत्या प्रकरण

कळमनुरीत गोवंश हत्येचा प्रकार उघड: 43 किलो गोमांसासह 62 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Kalmanuri cow slaughter case: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे गोवंश हत्येचा प्रकार उघडकीस आला. 43 किलो गोमांस व ताब्यातील दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

कळमनुरीत गोवंश हत्येचा प्रकार उघड: 43 किलो गोमांसासह 62 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Kalmanuri cow slaughter case

हिंगोली (Kalmanuri cow slaughter case) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात अवैध गोवंश हत्येचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फायद्यासाठी गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कळमनुरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 43 किलो गोमांस, कत्तलीसाठी बांधून ठेवलेला बैल आणि इतर साहित्य असा एकूण 62,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:50 वाजता कळमनुरीतील नुरी मोहल्ला, दर्गा रोड येथे राहणारे बाबु कुरेशी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.  रवि नारायण इंगोले यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

छाप्यादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून 43 किलो गोमांस अंदाजे किंमत 10,320 रु. (240 रु. प्रति किलो),एक जिवंत बैल कत्तलीसाठी निर्दयपणे आखूड दोरीने बांधलेला, किंमत अंदाजे 50,000 रु.,मांस तोडण्याचा काटा किंमत 2000 रु. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 62,320 रुपये आहे. या (Kalmanuri cow slaughter case) प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद गुलाम गौस उर्फ बाबु फकिर कुरेशी ,मोहम्मद अमेर मोहम्मद गुलाम गौस दोघेही नुरी मोहल्ला, दर्गा रोड, कळमनुरी येथील रहिवासी आहेत.

आरोपींविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित गोहत्या अधिनियम 1995* व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमताने, चारा-पाण्याची व्यवस्था न करता बैलाला बांधून ठेवून निर्दयपणे गोवंशाची कत्तल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर गुन्हा दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:24 वाजता नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास रवि नारायण इंगोले हे करीत आहेत. कळमनुरी पोलिसांच्या या (Kalmanuri cow slaughter case) कारवाईमुळे अवैध गोवंश हत्येच्या व्यवसायाला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026