श्रीराम नवमी उत्सव

भजन कीर्तन, महाप्रसाद, शोभायात्रेने तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्साहात साजरी

Shri Ram Navami Utsav: सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने भजन कीर्तन , प्रसाद वितरण आणि शोभायात्रा काढुन तीन दिवसीय श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली .

भजन कीर्तन, महाप्रसाद, शोभायात्रेने तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्साहात साजरी

Shri Ram Navami Utsav

"जय श्री राम , जय जय श्री राम" च्या जयघोषाने कन्हान परिसर दुमदुमले 

कन्हान (Shri Ram Navami Utsav) : सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने भजन कीर्तन , प्रसाद वितरण आणि शोभायात्रा काढुन तीन दिवसीय श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

श्रीराम नवमीच्या (Shri Ram Navami Utsav) दिवशी शिवपंचायत हनुमान मंदिर गांधी चौक येथे राम , लक्ष्मण , सीता यांच्या प्रतिमेचे युवा समाजिक कार्यकर्ता शुभम बावनकर , ऋषभ बावनकर यांच्या हस्ते जलाभिषेक , विधिवत पूजा अर्चना , हवन पुजा  करण्यात आली आणि दुपारी माऊली भजन मंडळ रायनगर , स्वामी विवेकानंदनगर यांचे भजन कीर्तन करुन श्रीराम नवमी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळी हनुमान चालीसा पाठन , महाआरती करण्यात आली . दुपारी नवदुर्गा भजन मंडळ, कांद्री यांचे भजन कीर्तन करण्यात आले आणि सायंकाळी महाप्रसाद वितरण करण्यात आला . शनिवार (दि.२८) मार्च रोजी दुपारी विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ , शिवाजी नगर कन्हान यांचे भजन कीर्तन करण्यात आले व सायंकाळी महाआरती करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत डीजे , राम दरबार , रामाचा रथ , घोडे आकर्षणाचे बिंदु ठरले . यात्रे दरम्यान शिवशंभु आखाडाच्या तरुणांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करुन भाविकांना मन मोहित केले. रामच्या वेशभूषेत तन्मय चरडे , सीताच्या वेशभूषेत वैष्णवी किरपाने , लक्ष्मणच्या वेशभूषेत अंश कोलते , हनुमानच्या वेशभूषेत तेजस बावनकुळे प्रामुख्याने सहभागी झाले होते.

यात्रा शिवपंचायत हनुमान मंदिर येथुन काढुन महामार्गने आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका , संताजी नगर चौक होऊन परत महामार्गाने परत हनुमान मंदिर गांधी चौक येथे यात्रेचे समापन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी जय श्री राम , जय जय श्री राम" च्या जयघोष केल्याने संपुर्ण कन्हान परिसर दुमदुमुन गेले होते व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या (Shri Ram Navami Utsav) प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , कन्हान - पिपरी नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , गटनेता मनोज कुरडकर , नगरसेविका सुचिता माटे , सरपंच सुनिल जामदार , लोकेश दमाहे , सुर्यभान चकोले , अविनाश कांबळे , अशोक पाटील , गजराज देवीया ,  बालकिशन गुप्ता , राजेंद्र हटवार , जीवन मुंगले , संदीप कुकडे , आशिष इंगोले , विनोद केने , विनोद यादव , रविंद्र दुपारे , मनोहर कोल्हे , चंद्रशेखर बावनकुळे , निखिल तांडेकर , नरेश आरबी , विक्की सोलंकी , मोहनसिंग यादव , नंदलाल यादव , राजेश बोपुलकर , अश्विन कांबळे , कवडु बारई, चंद्रभान मंगर , शंकर सराेदे , कांचनमाला माकडे , सरला बावनकर , सुषमा मस्के , रंजना किरपाने , अर्चना तांडेकर , मीना कळंबे , ममता मेश्राम , चंदा बावनकर , लता बावनकुळे , श्रुती किरपाने , मीना गिऱ्हे , पारबता लंगडे , सुरेखा नागपुरे , शोभाबाई मंगर , वडेबाई , गिताबाई भिलकर , मिराबाई तिडके , शारदा भंडारे , तनुजा वानखेडे , भारती महल्ले सह आदि भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर , आयुष संतापे , ऋषभ बावनकर , हिमांशु सावरकर , सुजल यादव , शिव यादव , ओम यादव , उद्यय माहुरे , वेदांत बावनकुळे , अमन यादव,प्रथमेश कोल्हे , सुर्या संतापे , शुभम संतापे , आर्यन संतापे यांच्या सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

Hingoli Dussehra Festival: थील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोमात सुरू झाली असून यावर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सव १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांसापूजन

Oct 04, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026