Khiladiyon Ki Goonj

‘छात्रों की गूंज’च्या धर्तीवर ‘खिलाड़ियों की गूंज’ उपक्रम सुरू करा; मयूर तायडे यांची राहुल गांधींकडे मागणी

‘खिलाड़ियों की गूंज’ हा स्वतंत्र राष्ट्रीय संवाद उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी वाशिम जिल्हा युवक काँग्रेस क्रीडा आघाडीचे अध्यक्ष मयूर तायडे यांनी केली आहे.

‘छात्रों की गूंज’च्या धर्तीवर ‘खिलाड़ियों की गूंज’ उपक्रम सुरू करा; मयूर तायडे यांची राहुल गांधींकडे मागणी

Khiladiyon Ki Goonj

मागणी राहुल गांधींपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार अमित झनक यांना निवेदन; खेळाडू रोजगार, पोषण, विमा आणि पारदर्शक क्रीडा निवड प्रक्रियेवर भर

रिसोड : काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या उपक्रमाचे स्वागत करत, त्याच धर्तीवर देशातील क्रीडा क्षेत्रातील तरुणांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘खिलाड़ियों की गूंज’ हा स्वतंत्र राष्ट्रीय संवाद उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी वाशिम जिल्हा युवक काँग्रेस क्रीडा आघाडीचे अध्यक्ष मयूर तायडे यांनी केली आहे.

ही मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी विनंती तायडे यांनी रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित (दादा) झनक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रस्तावित उपक्रमाच्या माध्यमातून देशातील खेळाडूंच्या विविध प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावे, अशी भूमिका मयूर तायडे यांनी मांडली आहे. त्यामध्ये विशेषतः खेळाडू रोजगार अभियान, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी पोषण व्यवस्था, दुखापत झालेल्या खेळाडूंना विमा संरक्षण आणि आर्थिक मदत तसेच तळागाळातील गुणवंत खेळाडूंच्या शोधासाठी विशेष मोहिमेचा समावेश आहे.

राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानपूर्वक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि सकस आहार योजना राबविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

सराव किंवा स्पर्धेदरम्यान दुखापत झालेल्या खेळाडूंना सर्वसमावेशक विमा संरक्षण आणि आर्थिक मदत मिळावी, तसेच प्रत्येक जिल्ह्यात तळागाळातील गुणवंत खेळाडू शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय, क्रीडा निवड प्रक्रियेतील वयोमर्यादा गैरप्रकारांवर कडक नियंत्रण ठेवून निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक क्रीडा साहित्य आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.

यावेळी मयूर तायडे यांनी खेळाडूंच्या संघर्षाकडे लक्ष वेधताना म्हटले, “पदक जिंकल्यावर टाळ्या वाजवणारे अनेक असतात; पण पदक जिंकण्यापूर्वीचा संघर्ष ऐकणारे फार कमी असतात.” ‘खिलाड़ियों की गूंज’ हा केवळ एक कार्यक्रम न राहता देशातील प्रत्येक खेळाडूच्या हक्काचा, सन्मानाचा आणि भविष्याचा राष्ट्रीय आवाज बनायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

— मयूर तायडे
अध्यक्ष, युवक काँग्रेस क्रीडा आघाडी, वाशिम जिल्हा

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
मुख्यमंत्री साहेब, आकांक्षीत वाशिम जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा!

मुख्यमंत्री साहेब, आकांक्षीत वाशिम जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा!

Washim District Dry Drought: तब्बल गेल्या दिड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सर्वत्र कोरड्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्री साहेब..

Sep 24, 2026