मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

CM Devendra Fadnavis: लातूर महानगरपालिकेमध्ये 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर लोकप्रतिनिधींना पुरेशी चर्चा व आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच सर्व विषय मंजूर

लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

CM Devendra Fadnavis

लातूर (CM Devendra Fadnavis) : लातूर महानगरपालिकेमध्ये 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर लोकप्रतिनिधींना पुरेशी चर्चा व आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच सर्व विषय मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेत लातूर महापालिकेतील कारभाराचे गाऱ्हाणे मांडले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या मंजूर विषयाची अंमलबजावणी थांबवावी, असे साकडेही घातले.

लातूर महानगरपालिकेच्या 5 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील कामकाजाबाबत लातूरच्या पालकमंत्र्यांना साक्षी ठेवत महापालिकेतील भाजपाच्या काही नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या सभेत प्रमुख विषय असलेल्या दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा ठराव काँग्रेसने या विषयांमध्ये मंजूर केला आहे. या विषयावर चर्चेसाठी वेळ दिला नाही, भाजपाच्या नगरसेवकांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली नाही, अशी भूमिका यावेळी मुख्यमंत्र्यांकडे (CM Devendra Fadnavis) मांडण्यात आली. या विषय पत्रिकेवर असलेले सर्व 28 विषय महापालिका सभेत एका दणक्यात वाचून मंजूर करण्यात आले आणि सभा आटोपण्यात आली होती.

याबाबत ही नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे (CM Devendra Fadnavis) सविस्तर माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून सभेच्या संपूर्ण कामकाजाची सक्षम स्तरावर सखोल चौकशी करावी. नियमबाह्य पद्धतीने मंजूर झालेले ठराव, त्यांची अंमलबजावणी थांबवून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रसंगी नगरसेवक गिरीश पाटील, रविशंकर जाधव, गणेश गवारे, सतीश मिरजे, अजित पाटील उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक ACBच्या जाळ्यात; NOCसाठी चांदीची अंगठी लाच घेतल्याचा आरोप

सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक ACBच्या जाळ्यात; NOCसाठी चांदीची अंगठी लाच घेतल्याचा आरोप

चांदीची अंगठी मागितल्याचा आरोप असलेला स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जाळ्यात पकडले.

Sep 05, 2026