रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा डाव हाणुन पाडला

रूग्णवाहिकेच्या माध्यमातून गंभीर रूग्णांना रूग्णालयापर्यंत पोहचवून त्यांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत केली जाते.

रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा डाव हाणुन पाडला

Liquor Smuggling

१२ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

आष्टी (Liquor Smuggling) : रूग्णवाहिकेच्या माध्यमातून गंभीर रूग्णांना रूग्णालयापर्यंत पोहचवून त्यांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत केली जाते. यामुळे रूग्णवाहिकेस पोलीस अटकाव करीत नाही  हे हेरून दारू तस्करांनी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून दारू तस्करीचा डाव  आखला. मात्र आष्टी पोलीस ठाण्याच्या चाणाक्ष अधिकारी व जवानांनी  दारू तस्करांचा हा डाव हाणुन पाडला असून तब्बल १२ लाख २८ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आष्टी येथील महात्मा फुले महाविद्यालयाजवळ रुग्णवाहिकेमधून दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचत अ‍ॅम्बुलन्स लिहिलेल्या पांढर्‍या रंगाच्या मारुती सुझुकी इको क्रमांक एम एच ३४ बी आर ५७५३ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची देशी-विदेशी दारू असल्याचे दिसून आले.

तपासणी दरम्यान विविध  कंपन्यांची ८ लाख २८ हजार ८०० रुपयांची दारू व अंदाजे चार लाख रुपयांचे वाहन असा एकूण १२ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त  केला.

या घटनेतील आरोपी सुलतान मोहम्मद शेख व सौरभ चंदू गायकवाड दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून दोघांना आष्टी पोलिसांनी अटक केलेली आहे
ही कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात  करण्यात आली आहे.पुढील तपास  पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्य्क पोलीस निरीक्षक मदन  मस्के करीत  आहेत.अ‍ॅम्बुलन्स लिहिलेली सदर रुग्णवाहिका ही कुणाची आहे याचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत ३९ हजार ४० रुपयांची दारू आणि एक लाख रुपयांची कार असा एकूण १ लाख ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Sep 13, 2026
परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीतील पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव ते पालम रोडवरील जगदंबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेली अवैध देशी दारू जप्त केली आहे.

Aug 22, 2026
परभणीत पुर्णेच्या दारु दुकानातून होणारी तस्करी पोलिसांनी पकडली...!

परभणीत पुर्णेच्या दारु दुकानातून होणारी तस्करी पोलिसांनी पकडली...!

Parbhani Liquor Smuggling: पुर्णेच्या दारु दुकानातून होत असलेली देशी दारुची तस्करी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील अंमलदारांनी पकडली आहे.

Aug 14, 2026
परभणीतील जिंतूरात बोलेरोसह ७ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त

परभणीतील जिंतूरात बोलेरोसह ७ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त

Jintur Gutkha Seized: शहरातील दादा शरीफ चौक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे धाडसी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पान मसाला वाहतूक करणारी बोलेरो गाडी पकडली.

Aug 09, 2026