हेरंब कुलकर्णी

महात्मा फुलेंचा वारसा केवळ रक्ताचा नाही, तर विचारांचा

Heramb Kulkarni: हेरंब कुलकर्णी यांनी नांदेडमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्व आणि त्यांच्या विचारवंत वारसाची ओळख करून दिली.

महात्मा फुलेंचा वारसा केवळ रक्ताचा नाही, तर विचारांचा

Heramb Kulkarni

सुशिक्षित वर्गाने आत्मचिंतन करण्याची गरज: हेरंब कुलकर्णी

नांदेड (Heramb Kulkarni) :  "आपल्याला आपल्या तीन पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांची नावे कदाचित ठाऊक नसतील, मात्र २०० वर्षांनंतरही महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आकर्षण वाटते. हे नातं केवळ जैविक नसून ते विचारांचे आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी केले.मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि आयआयबी यांच्या विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अशोक नगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात 'महात्मा फुले' या विषयावर कुलकर्णी बोलत होते.

पुढे बोलताना ते (Heramb Kulkarni) म्हणाले की, महात्मा फुले यांनी शिक्षण, शेती, उद्योग आणि भारतीय परंपरेची चिकित्सा अशा सर्वच क्षेत्रांत मूलभूत कार्य केले आहे. ते केवळ विचारवंतच नव्हे तर प्रयोगशील शेतकरी आणि उद्योजकही होते. आज बहुजन समाजातील सुशिक्षित मध्यमवर्ग स्वतःच्या मुळांपासून तुटून पुन्हा कर्मकांडांच्या आहारी जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे चक्र तोडण्यासाठी सुशिक्षितांनी आपल्या भौतिक आकांक्षांना मर्यादा घालून समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.फुले यांच्या द्विशताब्दी वर्षात सुशिक्षित वर्गातील विद्रोही भान पुन्हा जागृत करणे, हाच खरा आजचा प्रश्न आहे. जर आपण हे करू शकलो नाही, तर वाढती धनशक्ती आणि जातीय वास्तव वंचितांचे जगणे अधिक कठीण करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांचे स्वागत 'मसाप'चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य देवीदास फुलारी आणि आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहकार्यवाह राम तरटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांनी मानले. या व्याख्यानाला माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्यासह शहरातील नागरिक आणि विचारवंत  उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या अफाट कार्याची माहिती गावागावत पोहचविण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांचा प्रयत्न

महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अफाट कार्याची माहिती गावागावात पोहचविण्यासाठी राज्यभर दोन हजार व्याख्यान देण्यासाठी सध्या हेरंब कुलकर्णी हे गावोगाव फिरत आहेत.पाठ्यपुस्तकात फुलेविषयी मजकूर कमी होत गेल्याने व मध्ये बराच काळ फुलेविषयी तपशीलवार माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून त्यांनी ६८ पानांची पिडिएफ बनवली आहे.त्यासाठी ३ महिने त्यांनी वाचन केले. यात फुलेंचे चरित्र, त्यांचे महिला प्रश्नावर, शिक्षणावर विचार, विधवांसाठी केलेले काम, पुरोहितशाही, धार्मिक कर्मकांड यावर फुलेंचे विश्लेषण, शेतीविषयक चिंतन त्यावर केलेले काम, फुलेंनी लिहिलेल्या पुस्तकांचा परिचय असे सविस्तर तपशील त्यांनी दिले आहेत.त्याचबरोबर आजचे शिक्षणाचे प्रश्न, आजचे शेतीचे प्रश्न, आजचे पुरोहितशाही आव्हान आज एकल महिलांचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न याविषयी सुद्धा मुद्दे दिले आहेत.इतरांनी ती पिडिएफ वाचून किमान ५ व्याख्याने द्यावीत,असे आवाहन देखील हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026