लग्नासाठी बाहेर पडताच घरफोडी; मानकापुरात ३.४६ लाखांची चोरी

मानकापूर परिसरात लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या महिलेच्या बंद घरातून चोरट्यांनी ३ लाख ४६ हजार ६०० रुपयांचे दागिने व ऐवज चोरून नेला.

लग्नासाठी बाहेर पडताच घरफोडी; मानकापुरात ३.४६ लाखांची चोरी

Manakapur Theft

नागपूर (Manakapur Theft) : कुटुंबासह लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या महिलेच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मानकापूर परिसरात उघडकीस आली आहे.

मानकापूर हद्दीतील विशाखा सोसायटी, गोरेवाडा येथील प्लॉट क्रमांक ३७५ मध्ये राहणाऱ्या ज्योती संजय कुशवाहा (३९) या १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून कुटुंबासह पन्ना (मध्यप्रदेश) येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेल्या होत्या. २८ एप्रिल रोजी रात्री ८.३५ वाजता त्या परत आल्यावर घराचे लोखंडी गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

संशय आल्याने त्यांनी घरात पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी आलमारीतील स्टीलची पेटी आणि पर्समधील सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी एकूण ३ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी ज्योती कुशवाहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026