आसोला रस्ता दुरुस्ती

आसोला खु. ते कारपा पांदण रस्त्याची दुरुस्ती करावी; बांधकाम विभागाकडे मागणी

Asola Road Repair: कारपा पांदण रस्त्याची लांबशेळीच्या वर्यांनी दुरुस्तीअभावामुळे शेतकऱ्यांना धोकादायक बनलेला असल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती मागणी झाली आहे.

आसोला खु. ते कारपा पांदण रस्त्याची दुरुस्ती करावी; बांधकाम विभागाकडे मागणी

Asola Road Repair

मानोरा (Asola Road Repair) : तालुक्यातील आसोला खु. ते कारपा पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. याबाबत शेतकरी युवराज राठोड यांनी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानोरा यांना तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे निवेदन दिले आहे. 
           
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी खराब झाला (Asola Road Repair) असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. रस्त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन शेतकऱ्यांना शेतात जाणे धोकादायक ठरणार आहे.  तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि गवत वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे.

अनेक ठिकाणी रस्ता अरुंद (Asola Road Repair) झाला असल्याने वेळेवर शेतात पोहोचता न आल्यामुळे पेरणी, फवारणी व इतर शेतीकामांवर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याची तात्काळ पाहणी करून आवश्यक ठिकाणी  बंधारे व दोन्ही बाजूंनी नाल्यांची उभारणी करावी, रस्त्यावरील झाडे-झुडपे हटवून रस्ता रुंदीकरण करावे आणि पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. येत्या १५ जून पूर्वी काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना उपोषण व रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून सबंधित विभागाला दिला आहे.

संबंधित सामग्री

मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Manora Taluka Dry Drought: मानोरा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..

Sep 24, 2026
मानोरा तालुक्यात पिक पाहणीसाठी पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

मानोरा तालुक्यात पिक पाहणीसाठी पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

Manora Taluka Pik Inspection: मानोरा तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून करण्यासाठी कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचा शासकीय

Sep 20, 2026
‘देशोन्नती’च्या वृत्ताचा धसका! चिखली आगार व्यवस्थापकांचे विभागीय नियंत्रकांना पत्र

‘देशोन्नती’च्या वृत्ताचा धसका! चिखली आगार व्यवस्थापकांचे विभागीय नियंत्रकांना पत्र

‘देशोन्नती’च्या वृत्तानंतर चिखली आगार व्यवस्थापकांचे विभागीय नियंत्रकांना पत्र; बसस्थानक व आगारातील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी.

Sep 19, 2026
मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन

Manora Taluka Dry Drought: वाशिम जिल्ह्यासह मानोरा तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर पावसाच्या खंडामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरीपुत्र ऋषी पाटील चौधरी यांनी

Sep 17, 2026
विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

Manora Taluka Drought: डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिक्षण, सिंचन व आरोग्यासह मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या राज्यातील अती मागास आकांक्षीत तालुका म्हणून राज्यात गणना होणाऱ्या मानोरा

Sep 14, 2026