मराठा आरक्षण बैलजोडी महामोर्चा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत तहसीलवर शेकडो बैलजोड्यांचा महामोर्चा धडकला; सरकारचा निषेध

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तात्काळ तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज वसमत येथे अभूतपूर्व आंदोलन पाहायला मिळाले...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत तहसीलवर शेकडो बैलजोड्यांचा महामोर्चा धडकला; सरकारचा निषेध

Maratha Reservation

वसमत (Maratha Reservation) : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तात्काळ तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज वसमत येथे अभूतपूर्व आंदोलन पाहायला मिळाले. शेकडो बैलजोड्या घेऊन मराठा बांधवांनी वसमत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत शासनाचा निषेध केला.

बळीराजाचा सण असलेल्या बैलपोळ्याचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने हा अनोखा मोर्चा काढला होता. सजवलेल्या बैलजोड्या, गळ्यात घंटा, अंगावर झुली आणि बैलांच्या शिंगांना रंगवून शेतकरी तहसील कार्यालयासमोर दाखल झाले. यावेळी संपूर्ण तहसील परिसर भगवामय झाला होता.

तहसीलला फेरी मारून शासनाचा निषेध

 वसमत शहरातील सत्यनारायण टाॅकीज,झेंडा चौक,शहर पोलीस स्टेशन,गवळी मारोती मंदिर,तहसील कार्यालय असा भव्य बैल मोर्चा काढण्यात आला वसमत शहर व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घेऊन तहसील कार्यालयाला फेरी मारली. "एक मराठा, लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे", "मनोज दादा तुम आगे बढो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आंदोलकांनी  राज्य सरकारचा निषेध करत, मराठा समाजाच्या न्याय मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आणि वसमत तहसील समोर रविकिरण वाघमारे यांचे उपोषण याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC प्रवर्गातून आरक्षण द्यावे.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने इशारा देण्यात आला की, "जर लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. आज आम्ही बैलजोड्या आणल्या, उद्या हजारो ट्रॅक्टर घेऊन मुंबईकडे कूच करू."

या (Maratha Reservation) मोर्चामुळे वसमत शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वसमत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून, शेतकरी आणि सकल मराठा समाज वसमत शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यात तरुण, ज्येष्ठ आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.

संबंधित सामग्री

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

Maratha reservation Suicide Case: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना

Sep 21, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026
मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ९० दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

Sep 17, 2026
मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असताना शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय.

Sep 16, 2026
‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा आहे. या १२ मागण्या तातडीने सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Sep 16, 2026