Maratha Reservation

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; पुयना येथे युवकाचे पाण्याच्या टाकीवर बेमुदत आंदोलन

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील पुयना येथील लक्ष्मण टवले यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; पुयना येथे युवकाचे पाण्याच्या टाकीवर बेमुदत आंदोलन

Maratha Reservation

लक्ष्मण टवले चार दिवसांपासून टाकीवरच उपोषणाला; पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन घेतली माहिती

कळमनुरी : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील पुयना येथील लक्ष्मण टवले यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. गेल्या चार दिवसांपासून टवले हे पाण्याच्या टाकीवरच उपोषण करत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मण टवले यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

टवले हे पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सपोउपनिरीक्षक लक्ष्मीकांत माखणे आणि नामदेव कोटकर यांनी उपोषणस्थळी भेट देत लक्ष्मण टवले यांच्याशी चर्चा केली.

पाण्याच्या टाकीवर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. टवले यांच्या आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका लक्ष्मण टवले यांनी घेतली आहे. त्यामुळे पुढील काळात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026