मानोरा (Dhanora-Waigol Road) : तालुक्यातील धानोरा ते वाईगोळ या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अतिक्रमणाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप फुलउमरी येथील निलेश प्रकाश राठोड यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी याजकडे तक्रारकर्त्याने केली आहे.
धानोरा ते वाईगोळ या (Dhanora-Waigol Road) रस्त्याचे काम सध्या सुरू असून या मार्गावर फुलउमरी हे गाव मानोरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाला लागूनच हा मार्ग जात असल्याने रस्त्याच्या दर्जा व अतिक्रमणामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गावर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. ते हटवण्यासाठी संबंधित आय.सी.सी. इन्फ्राटेक कंपनीने फुलउमरी ग्रामपंचायतीस पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार काही लोकांनी अतिक्रमण हटविले आहे, परंतु काही लोक अजूनही अतिक्रमण हटविण्यास तयार नाहीत. इस्टिमेटनुसार २४ मीटर अतिक्रमण हटविण्याचे कामही टाळाटाळ करून रखडवण्यात येत आहे.
या बाबतीत कामावर पाहणी करणारे सुपरवायझर, इंजिनिअर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे की, सुपरवायझर, इंजिनिअर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी एकमेकांशी संगनमत करून काम सुरू ठेवले आहे. तसेच रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याच्या कामात पारदर्शकता नसल्याने शासकीय निधीचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहून जात होते. परंतु आता रस्त्याची उंची वाढविल्यामुळे ते पाणी लोकांच्या घरात जाण्याची शक्यता वाढली आहे. (Dhanora-Waigol Road) रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा संपूर्ण मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने गावातील सांडपाणी घरामध्ये साचण्याची व लोकांना त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, रस्त्याचे काम दर्जेदार करावे आणि अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी याजकडे निलेश राठोड यांनी केली आहे.
धानोरा-वाईगोळ रस्ता कामात अनियमितता; अतिक्रमणबाबत चौकशी करण्याची मागणी!
Dhanora-Waigol Road: धानोरा-वाईगोळ रस्त्याच्या कामात अतिक्रमणबाबत निलेश प्रकाश राठोड यांनी तकरार केली. जिल्हाधिकारीने चौकशी व करवाईसाठी मागणी करावी असे म्हटले आहे.
Dhanora-Waigol Road
संबंधित सामग्री
हिंगोली जिल्ह्यातील LIGO प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामात तफावत; बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन
Hingoli LIGO Project: हिंगोली येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्पासाठी तयार होणाऱ्या मुख्य पोच रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचा आरोप करत दुघाळा, बोरजा आणि पिंपळ परिसर..
अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!
Latur Municipal Shiv Sena: लातूर महापालिका ने शिवसेनाच्या मागण्यांना मान्य करण्याच्या प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या आयुक्तांनी विकास शुल्कचा चक्का, शहरातील सर्विस रोडवर अतिक्रमण
'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!
Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ किंवा विहित वेळेत होतच नाही, उलट आयुक्तांचे आदेश धूळ खात पडलेले असतात. हे आदेश धूळ खात पडण्यासाठी
शिवसेनेचा पालिका आयुक्तांना 14 आगस्टपर्यंत अल्टिमेटम!
Latur Municipal Corporation: शहरात बांधकाम प्रकरणामध्ये कागदपत्रांची असत्यता आढळल्यास व नियमावलीतील अटींचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांमध्ये अर्जदार/जागा मालक, संबंधित सल्लागार अभियंता/आर्किटेक