आमदार सावरकर

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar: आमदार सावरकरांनी पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar

बार्शीटाकळी (MLA Savarkar) : शेतकऱ्यांच्या अनेक पिढया झाल्यात, परंतु शेतात ये जा करण्यासाठी धड रस्ताही झाला नाही. परंतु आमदार सावरकरांनी (MLA Savarkar) पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.विकासासाठी झटणारा धडपडया माणूस म्हणजे आमदार सावरकर आहेत. असे परखड मत सामाजिक चळवळीचे तथा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी व्यक्त केले. 

देशाला स्वातंत्र्य मिळून  77 व78 वर्षाचा दीर्घ  संपल्यानंतरही,आज रस्ता होईल ,उद्या रस्ता होईल ,असे करता करता शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या संपल्यात परंतु गोरेगाव बु ते कापसी रोड पर्यंतचा खोलगट पांदण शेत रस्ता आजपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधीने केला नाही. परंतु अकोला पूर्व मतदार संघाचे एकमेव आमदार रणधीर सावरकरांनी या पांदण रस्त्याचे रूपांतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अंतर्गत डांबरीकरण रस्ताकरून केल्यानेया भागातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाची निगडित असलेली शेथरस्त्याची समस्या कायमस्वरूपात सोडविल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या महत्त्वपूर्ण रस्त्याप्रमाणेच आमदार सावरकरांनी (MLA Savarkar) , अनेक गावातील मुख्य रस्ते, गावागावातील अंतर्गत रस्ते, रस्त्यावरील लहान-मोठी पूल, गावागावातील पाणीटंचाईची कायम स्वरूपात समस्या सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजना, शाळा ,अंगणवाड्या, व्यायाम शाळा , सार्वजनिक सभागृह, सभा मंडप, अशाप्रकारचीकोट्यावधी रुपयांची दर्जेदार अनेक दिवस टिकणाऱ्या विकास कामा बरोबरच 24 तास जाती पातीच्या पलीकडे विना वशिल्याचे गरीबाचे काम करणारा तसेच विकासासाठी धडपडणारा एकमेव माणूस म्हणजेच या भागाचे आमदार सावरकर आहेत. असे मत छावाया सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी व्यक्त केले.

संबंधित सामग्री

गिरोली-कारपा रस्त्याचे काम निकृष्ट; कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची शिफारस

गिरोली-कारपा रस्त्याचे काम निकृष्ट; कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची शिफारस

गिरोली-कारपा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई व ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस जि.प. बांधकाम विभागाने केली.

Sep 19, 2026
मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी जनआक्रोश महामोर्चा; हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी जनआक्रोश महामोर्चा; हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मानोरा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी १६ सप्टेंबरला महाविकास आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा; हजारोंच्या सहभागाचे आवाहन.

Sep 12, 2026
दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026