झोपलेल्या महिलेचा तोंड दाबून विनयभंग

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात झोपलेल्या ४० वर्षीय महिलेचा तोंड दाबून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

झोपलेल्या महिलेचा तोंड दाबून विनयभंग

Molestation Case

हिंगोली (Molestation Case) : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात झोपलेल्या ४० वर्षीय महिलेचा तोंड दाबून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी तेजस छगन भिसे उर्फ मुन्ना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला घरात झोपलेली असताना आरोपी तेजस छगन भिसे उर्फ मुन्ना हा घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेला जाग आल्यानंतर तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पुन्हा तिचे तोंड दाबून आवाज केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

मात्र महिलेने धाडस दाखवत आरोपीला ढकलून देत आरडाओरड केली. महिलेचा पती जागा होताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी दि. २२ मे रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तेजस छगन भिसे उर्फ मुन्ना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बापुराव चव्हाण हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026