श्री नागनाथ मंदिर

श्री नागनाथ मंदिर: भक्ताकडून सव्वा लाख बिल्वपत्र अर्पण 

Shri Nagnath Temple: श्रीनिवास अजमेरा,सविता अजमेरा तसेच गोविंद अजमेरा मनीषा अजमेरा यांच्या वतीने श्री नागनाथास सव्वा लाख बिल्वपत्र अर्पण करत पूजा अर्चना करत रुद्राअभिषेक केला

श्री नागनाथ मंदिर: भक्ताकडून सव्वा लाख बिल्वपत्र अर्पण 

Shri Nagnath Temple

औंढा नागनाथ (Shri Nagnath Temple) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात श्री नागनाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शिवभक्त दाखल होत असल्याने दिवसेंदिवस शिवभक्तांची गर्दी वाढत असून संस्थांकडूनही येथे भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी श्रीनिवास अजमेरा,सविता अजमेरा तसेच गोविंद अजमेरा मनीषा अजमेरा यांच्या वतीने श्री नागनाथास सव्वा लाख बिल्वपत्र अर्पण करत पूजा अर्चना करत रुद्राअभिषेक केला. यावेळी अजमेरा परिवाराचे श्री नागनाथ संस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व प्रसाद घेऊन सत्कार करण्यात आला. 

रुद्रा अभिषेकाचे आवर्तन मंत्र मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, बंडू भोपी, अभिजीत लोखंडे, महेश जोशी, निळकंठ देव, महेंद्र जोशी, यांच्यासह इतर पुरोहितानी म्हटले. यानंतर अजमेरा परिवाराचे मंदिर संस्थांकडून शाल श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी,मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे,मंदिर कर्मचारी कृष्णा पाटील, गार्ड दसरथ राठोड, नितीन देशमुख,आकाश सोनूणे, यांच्यासह आनंद अजमेरा, रामेश्वर अजमेरा, संजय अजमेरा, कमल अजमेरा, विजय अजमेरा, पंकज अजमेरा, राजगोपाल मणिहार, शोभा लाहोटी, दत्तराव मिसाळ, मारुती वाघ,उद्धव मस्के, पायल अजमेरा, सुनीता अजमेरा, सुनंदा अजमेरा यांच्या सहभागी भक्त यांची उपस्थिती होती. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेले भाविक (Shri Nagnath Temple) औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन घेऊन मार्गस्थ होत असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी वाढली आहे.

संबंधित सामग्री

श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शनिवार, रविवार तसेच श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 22, 2026
नागपंचमीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; तीन भाविक गंभीर जखमी

नागपंचमीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; तीन भाविक गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे नागपंचमीच्या निमित्ताने महाकालेश्वर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

Aug 17, 2026
अजमेरहून परतणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या कारचा धुळेत भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर

अजमेरहून परतणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या कारचा धुळेत भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर

अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कुटुंबावर धुळे जिल्ह्यात काळाने घाला घातला.

Jul 18, 2026
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन 

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन 

SP Shrenik Lodha: येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे हिंगोलीचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पूजा अभिषेक करत दर्शन घेतले व हेमाडपंथी मंदिराची पहाणी

Jul 14, 2026
त्र्यंबकेश्वरच्या अमृतकुंडाच्या तळाशी प्राचीन शिवलिंगाचे दुर्मिळ दर्शन; अनेक वर्षांनंतर उलगडले ऐतिहासिक रहस्य

त्र्यंबकेश्वरच्या अमृतकुंडाच्या तळाशी प्राचीन शिवलिंगाचे दुर्मिळ दर्शन; अनेक वर्षांनंतर उलगडले ऐतिहासिक रहस्य

देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना घडली आहे.

Jun 29, 2026