Nanded Attack

नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपी अटकेत, फडणवीसांकडून पोलिसांकडून माहिती

शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपी अटकेत, फडणवीसांकडून पोलिसांकडून माहिती

Nanded Attack

तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वाराजवळ घडली घटना; हल्ल्याचा उद्देश तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वाराजवळ ही घटना घडली. हल्ल्यानंतर बादल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुखबीर सिंह बादल यांना एका इमारतीच्या दिशेने नेत असल्याचे दिसून येते. तसेच त्यांच्या उजव्या हाताला कापड बांधलेले असल्याचेही दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बादल यांची प्रकृती स्थिर आहे.

हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक एसपी रोहन नीलाभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखबीर सिंह यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव जसपाल सिंह असे आहे. जसपाल सिंह हा एक वयोवृद्ध माणूस आहे. घटनेनंतरचा त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हल्ल्यानंतर झालेल्या झटापटीत त्याची पगडी सुटली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जसपालची पगडी बांधताना दिसत असून हा व्हिडिओ हल्ल्यानंतरचा असल्याचे सांगितले जात आहे.

सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा लॉ (LAW) चे शिक्षण झाले असल्याचे सांगत आहे. अटकेनंतर आरोपीने सांगितले की, त्याने पुण्यातून वकिलीचे शिक्षण घेतले आहे. सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबला उडता पंजाब बनवले, ज्यामुळे मी प्रचंड संतापात होतो. पंजाबमध्ये वाढत्या अंमली पदार्थांमुळे आपण रागात होतो. यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

सुखबीर सिंह बादल हे त्यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासोबत नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब येथे गेले होते. त्याचवेळी गुरुद्वारा परिसरात त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली.

या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून  याचा सखोल तपास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बादल यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, घटना नुकतीच घडली असून त्याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल. आपण पक्षाच्या बैठकीसाठी भंडाऱ्यात उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची वस्तुनिष्ठ माहिती समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका पंकज भोयर यांनी स्पष्ट केली.

गुरुद्वारा परिसरासारख्या संवेदनशील ठिकाणी सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. पोलिसांकडून आता हल्ल्याच्या पार्श्वभूमीचा आणि आरोपीच्या उद्देशाचा तपास केला जात आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026